नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने ती फसवी कर्जमाफी असल्याची टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी केली आहे.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या लाखो शेतकऱ्यांना नव्या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे सरकार सांगत असलेल्या लाभार्थ्यांच्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष लाभार्थ्यांची संख्या खूपच कमी राहणार असून ही योजना शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आहे.
राज्यात यंदाचा उन्हाळा तीव्र ठरला असून मान्सूनलाही विलंब झाला आहे. अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी आणि दुष्काळाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी त्यांनी केली. शेतकरी आणि राज्यासमोरील विविध प्रश्नांवर सर्वसमावेशक चर्चा होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, देशासमोर उभ्या राहिलेल्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आज होणारी INDIA Alliance ची बैठक महत्त्वाची असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांमधील वाढता असंतोष, पेपरफुटीच्या घटना, परीक्षा व निकाल प्रक्रियेतील गोंधळ, वाढती महागाई तसेच पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किंमती यांसारख्या विषयांवर बैठकीत सखोल चर्चा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देशातील तरुण न्यायासाठी रस्त्यावर उतरले आहेत. शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला असून पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. या सर्व प्रश्नांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी इंडिया आघाडी एकजुटीने पुढे जाईल, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…
मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…
षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त…
मुंबई: विक्रोळीतील टागोर नगर परिसरातील तक्षशील बुद्ध विहार येथे 49, स्वस्तिक एमराल्ड जयंतीउत्सव समिती, भारतीय…