महाराष्ट्र

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात सुमारे २.५ कोटी रुपये किमतीच्या लक्झरी SUVने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात २० वर्षीय स्विगी डिलिव्हरी बॉयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शुभम प्रजापती (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री सुमारे १०.१५ वाजता शुभम दुचाकीवरून पार्सल डिलिव्हरीसाठी जात असताना हा अपघात झाला. SUVची धडक इतकी जोरदार होती की शुभमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो रस्त्यावर कोसळला.

अपघाताची माहिती मिळताच वांद्रे पोलिसांच्या गस्ती पथकाने घटनास्थळी धाव घेतली. शुभमला तातडीने भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मध्यरात्री १२.१२ वाजता त्याचा मृत्यू झाला. त्याच्या खिशातील ओळखपत्राच्या आधारे पोलिसांनी त्याची ओळख पटवून कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.

राजस्थान पासिंगच्या SUVचा चालक अटकेत

या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी राजस्थान पासिंग असलेल्या काळ्या रंगाच्या लक्झरी SUVचा चालक **युवराज बाहेती (वय २८)** याला अटक केली आहे. ही कार महालक्ष्मी येथील आयात-निर्यात व्यवसायिकाच्या मुलाची असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी आरोपी मद्यधुंद अवस्थेत नव्हता. तो खार येथून महालक्ष्मीतील आपल्या घरी जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर बाहेती घटनास्थळावरून पळून गेला नाही, तर त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर केले. त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी BNS आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास वांद्रे पोलीस करत आहेत.दरम्यान, अवघ्या एका पार्सलच्या डिलिव्हरीसाठी घराबाहेर पडलेल्या शुभमच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

42 मिनिटे ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

48 मिनिटे ago

दीड महिन्यापूर्वीच लग्न; भीमाशंकर दर्शनासाठी आलेल्या २५ वर्षीय कारचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुणे : भाविकांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन आलेल्या २५ वर्षीय तरुण कारचालकाचा अचानक हृदयविकाराचा झटका…

1 तास ago

शिक्षक दिनी मलठण सोसायटीकडून गुरुजनांचा गौरव

शिक्रापूर (सुनिल जिते): शिक्षक दिनाचे औचित्य साधून मलठण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने गावातील…

1 तास ago

दहीहंडीचा थरार ठरला जीवघेणा! मुंबई-नवी मुंबईत दोन दुर्घटनांत दोघांचा मृत्यू; १६८ गोविंदा जखमी

मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असतानाच मुंबई आणि नवी…

2 तास ago

आई-बहीण, पत्नीबाबत अश्लील शिवीगाळ अन् जीभ कापण्याची धमकी

आमदार संजय गायकवाडांविरोधात कोथरूड पोलिसांकडे तक्रार पुणे: संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.…

2 तास ago