महाराष्ट्र

काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये उद्या गुरुवार पासून २ दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा

मुंबई: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र विभागातील सर्व उमेदवारांसाठी दोन दिवसांच्या निवासी प्रशिक्षण कार्यशाळा त्र्यंबकेश्वर येथे आयोजित केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या या लोकप्रतिनिधी प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन उद्या गुरुवार दिनांक १२ मार्च रोजी श्रीचंद्र गार्डन लॉन्स येथे होणार असून १३ मार्चला कार्यशाळेची सांगता होणार आहे.

या प्रशिक्षण कार्यशाळेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अखिल भारतीय कार्य समितीचे सदस्य, माजी मंत्री बाळासाहेब थोरात,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व तेलंगणाचे सहप्रभारी सचिन सावंत, माजी मंत्री वसंत पुरके यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते व विविध विषयातील तज्ज्ञ यावेळी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करणार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काँग्रेसचे प्रतिनिधी अधिक सक्षम, संवेदनशील आणि विकासाभिमुख व्हावेत, या उद्देशाने ही लोकप्रतिनिधी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. याआधी २७ फेब्रुवारी ते १ मार्च असे तीन दिवस कोकण विभागासाठी चिपळूण येथे प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली तर पुढील टप्प्यांमध्ये इतर विभागांतही अशाच प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणातील वाळूमाफियां विरोधात वडगाव-शिंदोडी ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

श्रीगोंदा (विशेष प्रतिनिधी) घोड धरणाच्या बॅकवॉटरमध्ये गेल्या पाच वर्षांपासून रात्रंदिवस बेकायदशीर वाळू उपसा सुरु असून,…

3 तास ago

शिरुर पोलिस ऍक्शन मोडवर ‘राजहंस लॉज’ वर छापा टाकत अनधिकृत ‘वेश्या’ व्यवसाय प्रकरणी एका पत्रकारासह दोघांना अटक

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथील राजहंस लॉजमध्ये महिलेकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची…

5 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित शिवसेनेचा दसरा मेळावा; मदतीसाठी राज्यव्यापी कार्यक्रमाची घोषणा होणार

मुंबई: राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा संकटग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित केला आहे. गोरेगाव येथील…

2 दिवस ago

दुष्काळग्रस्त गावांसाठी स्वतंत्र सूक्ष्म कृती आराखडे तयार करा

धाराशिव जिल्ह्यातील पाणी, चारा टंचाईवर उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश धाराशिव: जिल्ह्यातील…

2 दिवस ago

टायगर श्रॉफच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे वांद्र्यात; कलाकारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे निर्देश

मुंबई: बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर आज संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली. या…

2 दिवस ago

मुंबईत पुन्हा दहशतीचे दिवस परतू देणार नाही; एकनाथ शिंदेंचा इशारा

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाची गंभीर दखल; आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात नागपूर: मुंबईत पुन्हा दहशतीचे…

2 दिवस ago