महाराष्ट्र

सत्तेसाठी मराठा-ओबीसी संघर्ष पेटवला; फडणवीस-शिंदेंनी महाराष्ट्राचे नुकसान केले!

विजय वडेट्टीवारांचा घणाघात; जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी

नागपूर : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाचा खरा चेहरा महाराष्ट्रासमोर आणल्याचा दावा करत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपद आणि सत्तेच्या हव्यासापोटी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटवून राज्याचे मोठे नुकसान करण्यात आले, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला.

मनोज जरांगे पाटील यांनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासली पाहिजे. या क्लिपच्या माध्यमातून कोणाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्यामागील सत्यही जनतेसमोर आले पाहिजे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

‘देवाभाऊ आणि एकनाथ भाई जनतेचे नव्हे, सत्तेचे राजकारण करताहेत’

मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील संघर्ष आता विकोपाला गेल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. सत्तेसाठी समाजा-समाजात भांडणे लावण्याचे राजकारण महाराष्ट्राच्या हिताचे नाही. मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासातून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. या राजकारणामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले असून, ‘देवाभाऊ आणि एकनाथ भाई हे जनतेचे नव्हे, तर सत्तेचे राजकारण करत आहेत,’ अशी टीका त्यांनी केली.

राज्यात एकीकडे दुष्काळाचे संकट गंभीर बनले आहे, बेरोजगारी वाढत आहे, तर दुसरीकडे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. तरुणांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर असताना सत्ताधारी मुख्यमंत्रीपदासाठी कोणत्या थराला जात आहेत, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. जनतेच्या प्रश्नांपेक्षा खुर्चीला प्राधान्य देणारे राजकारण राज्यासाठी घातक असल्याचेही ते म्हणाले.

‘१८० नव्हे, एक हजार शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याची संधी द्या’

शेतकऱ्यांना परदेशातील शेतीचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्याच्या निर्णयावरही वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना सरकारने सर्वप्रथम शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्याला प्राधान्य द्यावे. शेतकऱ्यांच्या हातात पैसे नाहीत, शेती संकटात आहे आणि पिकांचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत केवळ अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करून सरकारची जबाबदारी संपत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

केवळ १८० शेतकऱ्यांना परदेशात पाठवण्याऐवजी एक हजार शेतकऱ्यांना ही संधी द्यावी. राज्यातील प्रत्येक विभागातून किमान २०० शेतकऱ्यांची निवड करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केवळ पाच हजार रुपयांची मदत देऊन त्यांची बोळवण केली जात असल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी केली. परदेश दौऱ्यांपेक्षा दुष्काळ निवारण आणि शेतकऱ्यांना दिलासा देणे हे सरकारचे पहिले प्राधान्य असले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला पाच जागांचा विश्वास

विधान परिषद निवडणुकीबाबत बोलताना वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीला पाच जागांवर यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा विजय होईल, असा दावाही त्यांनी केला. पुण्यातील दोन्ही जागांसह छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती येथील जागांवरही महाविकास आघाडी विजय मिळवेल, असे ते म्हणाले.

‘भाजपला निवडणुका जिंकण्यासाठी मतदार याद्यांमध्ये घोळ घालावा लागतो’

मतदार याद्यांमधील त्रुटींवरूनही वडेट्टीवार यांनी भाजपवर आरोप केले. मतदार याद्या सदोष असणे ही गंभीर बाब असून, भाजपला निवडणुका जिंकण्यासाठी मतदार याद्यांमध्ये घोळ घालावा लागतो, असा आरोप त्यांनी केला. बेइमानी केल्याशिवाय भाजप निवडणुका जिंकू शकत नाही, अशी टीका करत त्यांनी मतदार याद्यांमधील त्रुटींची गंभीर दखल घेण्याची गरज व्यक्त केली.

दुष्काळ, बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि मतदार याद्यांतील त्रुटी या मुद्द्यांवरून राज्य सरकारवर टीका करत वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांनी खुर्चीच्या राजकारणाऐवजी जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, अशी भूमिका मांडली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात पुन्हा शॉर्टसर्किट ऊसाच्या पिकाला आग…? दोन शेतकऱ्यांचे नुकसान

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एकीकडे दुष्काळात शेतकरी होरपळत असताना दुसरीकडे विजेच्या तारांच्या शॉर्टसर्किट मुळे…

5 तास ago

महाराष्ट्राचे स्वतंत्र रासायनिक उद्योग धोरण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात; पालघरमध्ये मोठे औद्योगिक केंद्र उभारणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘इंडिया केम २०२६’मध्ये घोषणा; रासायनिक उद्योगातील गुंतवणूक आणि रोजगार दुप्पट करण्यावर…

10 तास ago

बिश्नोई गँगला महाराष्ट्रात खुली सूट दिली आहे का? फडणवीसांनी त्याला मुंबईत आणून चौकशी करावी

हर्षवर्धन सपकाळ यांचा महायुती सरकारवर घणाघात; ५०० कोटींच्या आरोपांची ईडी चौकशी करण्याचीही मागणी मुंबई: राज्यातील वाढती…

10 तास ago

‘SIR रद्द करा, ज्ञानेश कुमारांचा राजीनामा द्या!’ युवक काँग्रेसचा एल्गार; आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी आंदोलन; अब्दुल समद यांचा आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा मुंबई: मुख्य निवडणूक…

10 तास ago

जेवणानंतर विड्याचे पान का खातात? कारण जाणून घ्या

जेवणानंतर पान खाण्याची पद्धत आपल्याकडे फार आधीपासून आहे. त्यामध्ये विविध मसाले तसेच फळांचे फ्लेवर घालून…

10 तास ago

१० पैकी ६ जणांच्या डोक्यात होतो सतत कोंडा, हा स्काल्प सोरायसिस तर नाही…

अनेक जणांच्या डोक्यामध्ये नेहमीच खूप कोंडा असतो. हिवाळ्यात कोंड्याचे प्रमाण वाढते हे सहाजिक आहे. पण…

10 तास ago