महाराष्ट्र

वाढदिवस साजरा न करता कृषिमंत्री धनंजय मुंडे मंत्रालयात

सुट्टीच्या दिवशी मंत्रालय उघडून घेतला विभागाचा आढावा

मुंबई: राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाची नियुक्ती होताच आज पहिल्याच दिवशी मंत्रालयात जाऊन कृषी विभागाची चार तास आढावा बैठक घेतली. धनंजय मुंडे यांचा वाढदिवस व सुट्टीचा दिवस असताना देखील मंत्रालय उघडून त्यांनी शेतकरी हितार्थ निर्णयाला प्राधान्य दिले.

कृषी विभागाची मागेल त्याला शेततळे व मागेल त्याला ड्रीप ( ठिबक सिंचन) , शेड नेट अशी योजना आहे. मात्र त्यामध्ये अर्ज करणाऱ्यांची संख्या लाखांवर असून विभागामार्फत दहा-दहा हजार शेतकऱ्यांची लॉटरी काढली जाते. लॉटरी काढायची असेल तर मग त्याला मागेल त्याला शेततळे, असे कसे म्हणता येईल, असे लक्षात आणून देत धनंजय मुंडे यांनी विभागाकडे शेततळ्यांचे व ड्रीपचे प्रलंबित असलेले सर्व प्रस्ताव तात्काळ निकाली काढावे असे निर्देश विभागाला दिले आहेत.

सध्या राज्यभरात व विशेष करून मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अद्याप कमी आहे शेतकऱ्यांवर बहुतांश ठिकाणी दुबार पेरणीचे ही संकट येऊ शकते त्यामुळे राज्य सरकारच्या महत्वकांक्षी एक रुपयात पिक विमा या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन तातडीने आपला पिक विमा भरणे गरजेचे आहे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले असून पिक विमा भरताना कोणत्याही ग्राहक सेवा केंद्राच्या चालकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्यास त्यावरही तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

राज्यात मागील काही दिवसात बोगस बियाण्यांच्या साठ्यांवर कारवाई करण्यात आली होती राज्यात कुठेही बोगस बियाण्यांची विक्री होत असेल अशा रॅकेटवर धडक कारवाया करून कुठेही शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याकडेही विभागाचे सर्वाधिक लक्ष असेल असेही धनंजय मुंडे यांनी आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

शेतकऱ्यांना पेरणीसाठी मदत करण्यापासून ते त्यांच्या पिकाला भाव मिळवण्यापर्यंत सर्व जबाबदारी ही कृषी विभागाची असून आपण अत्यंत प्रामाणिकपणे या विभागात चांगले काम करून दाखवू व कृषी विभागालाही प्रतिष्ठा मिळवून दाखवू, असेही मत त्यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

विभागात असलेल्या सर्व रिक्त पदांचाही अहवाल लवकर सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले आहेत. आजच्या बैठकीस कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, सहसचिव श्रीमती सरिता देशमुख-बांदेकर, उपसचिव संतोष कराड, फलोत्पादनचे संचालक कैलास मोते, विस्तार व प्रशिक्षण संचालक दिलीप झेंडे, निविष्ठा व गुण नियंत्रण संचालक विकास पाटील, मृद संधारण व पाणलोट विकासाचे संचालक रवी भोसले, आत्माचे संचालक दशरथ मंगाळे, कृषी प्रक्रिया व नियोजनाचे संचालक सुभाष नागरे आदी उपस्थित होते. कृषी विभागांतर्गत येणाऱ्या विविध योजनांमधील लाभार्थ्यांची संख्या वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषी विभागाच्या रूपाने वाढदिवसाचे गिफ्ट मिळाले

माझे वडील स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे हे शेतकरी होते त्यांनी ऊस तोडणीचेही काम केलेले आहे त्यांना शेतीची खूप आवड होती. काल ऐन वाढदिवसाच्या दिवशी मला कृषी खाते मिळाले याचा मला मनस्वी आनंद असून याबद्दल मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांचे आभार व्यक्त करतो असेही धनंजय मुंडे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

13 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

17 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

17 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

18 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

18 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

19 तास ago