महाराष्ट्र

नांदेड परिक्षेत्रात ‘ऑल आऊट ऑपरेशन’चा धडाका; दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

नांदेड: नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या नेतृत्वाखाली अवैध धंद्यांविरोधात पुकारलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’ अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. अहमदपूर, उमरी, मुदखेड, कळमनुरी, किनगाव आणि गंगाखेड या भागांमध्ये टाकलेल्या धाडीत अवैध वाळू उपसा व जुगार अड्ड्यांवर कारवाई करत सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने नागरिकांना पुराव्यानिशी तक्रारी करण्याचे आवाहन केले होते. प्राप्त माहितीनुसार खातरजमा करून विशेष पथकांनी समन्वयाने ही धडाकेबाज कारवाई केली.

वाळू माफियांवर टाच

गेल्या ४८ तासांत लातूर जिल्ह्यातील अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुई शेतशिवारात छापा टाकण्यात आला. येथे अवैधरित्या साठवलेली वाळू, हायवा ट्रक आणि जेसीबी मशीन असा मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच उमरी व मुदखेड परिसरातही अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करत संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जुगार अड्ड्यांवरही कारवाई

जुगारविरोधी मोहिमेत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे तीन आरोपींना अटक करून ४२ हजार १७० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. लातूरच्या किनगावमध्ये सात आरोपींकडून ४४ हजार ११० रुपये जप्त करण्यात आले, तर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे १९ आरोपींना अटक करून ६४ हजार ६१० रुपयांची रोकड व साहित्य हस्तगत करण्यात आले.

पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली. या मोहिमेमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, पुढील काळातही अशाच कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी सुनेत्रा पवार मैदानात; महायुती एकदिलाने काम करत असल्याचा दावा

नांदेडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जाहीर सभा; अजितदादांच्या विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन नांदेड: अजितदादा…

30 मिनिटे ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा मदतीचा हात; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक रवाना करणार; एकनाथ शिंदे

शेतकरी कुटुंबांतील महिलांना शिलाई मशीन, मुलींच्या विवाहासाठीही मदत; डोंबिवलीतील नवरात्रोत्सवातून सामाजिक बांधिलकीचा संदेश डोंबिवली :…

37 मिनिटे ago

ग्रंथालये टिकवणे ही काळाची गरज; ग्रंथसंपदा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक; सचिन अहिर

मुंबई: ग्रंथ माणसाला घडवण्याचे काम करतात. ही अमूल्य ग्रंथसंपदा उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचे जतन आणि…

42 मिनिटे ago

राष्ट्रीय इन्स्पायर–मानक स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी; श्रद्धा लोंढे देशात प्रथम

मुंबई: बाराव्या राष्ट्रीय इन्स्पायर–मानक प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून…

48 मिनिटे ago

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

3 तास ago

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

5 तास ago