महाराष्ट्र

आरोग्य तपासणीपासून विद्यार्थी वंचित राहणार नाही यासाठी ॲप विकसित करावे

मुंबई: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणीची अत्यंत आवश्यकता आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) च्या माध्यमातून शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी करण्यासाठी शालेय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या समन्वयाने वर्षभराची दिनदर्शिका तयार करावी आणि शाळांना पूर्वकल्पना देऊन पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. आरोग्य तपासणीपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही यासाठी ॲप विकसित करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत शालेय शिक्षण मंत्री श्री.भुसे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक अमगोथू श्री रंगा नायक, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या अतिरिक्त संचालक डॉ.कमलापूरकर, उपसंचालक रेखा गायकवाड आदी प्रत्यक्ष तर शिक्षण विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल आदी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री श्री.भुसे म्हणाले, आरोग्य तपासणीपूर्वी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना शाळेमार्फत सूचना देता येईल तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीच्या वेळी पालक त्यांच्यासोबत उपस्थित राहतील यासाठी विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी दिनदर्शिका तयार करण्यात यावी. तपासणीच्या दिवशी सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील, याची जबाबदारी शिक्षण विभागाने घ्यावी. विद्यार्थ्यांच्या नियमित तपासणीव्यतिरिक्त तो केव्हाही आजारी पडला तरीही त्याला ‘आरबीएसके’च्या माध्यमातून उपचार मिळावेत तसेच प्राथमिक तपासणीनंतर ज्या विद्यार्थ्यांना पुढील उपचाराची आवश्यकता असेल त्यांना संपूर्ण उपचार मिळतील याची दक्षता घ्यावी. यासाठी विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी नाशिक जिल्ह्याने तयार केलेल्या तसेच दमण येथे तयार करण्यात आलेल्या ॲपचा आरोग्य व शिक्षण विभागाच्या समन्वयातून अभ्यास करण्यात यावा. यातील चांगल्या बाबींचा समावेश करुन राज्यस्तरावर विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी ॲप तयार करण्यात यावे, अशा सूचना भुसे यांनी यावेळी दिल्या.

विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेचा जिल्हानिहाय आढावा घेण्याची सूचना करुन भुसे यांनी प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे या योजनेबाबत जागृती निर्माण करुन दुर्देवाने विद्यार्थ्याचा अपघात घडल्यास शिक्षकांनी स्वत:हून अशा विद्यार्थी आणि पालकांना मदत मिळेल, यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांचे आरोग्य ही अत्यावश्यक बाब असून यासाठी ‘आरबीएसके’च्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होईल, याची आरोग्य विभागाने दक्षता घेण्याची सूचना केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

टाकळी हाजी पोलीस हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट?; नागरिकांकडून कारवाईची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात जुगार, हातभट्टी दारू, ताडी तसेच अवैध मद्यविक्रीचे धंदे…

22 तास ago

शिरूर तालुक्यात डीपी चोरीच्या घटना; संयुक्त पथकाने गस्तीला सुरुवात…

शिक्रापूर (ओमकार भोरडे): महावितरणच्या रोहित्र (डीपी) चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी महावितरण व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त…

23 तास ago

शिरूर तालुक्यात प्रियकराने केली चिमुकल्याची हत्या; लिव्ह इन मुळे लाईफ धोक्यात…

शिरुर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून, एका तीन…

23 तास ago

यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २०५ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शालोपयोगी साहित्याचे वाटप

मुंबई : धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तक…

1 दिवस ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांवर शिक्रापूर पोलिसांचा वचक; दोन महिला रंगेहात जेरबंद

तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, कोरेगाव भीमा व तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारांमध्ये वाढत्या…

1 दिवस ago

शिरूरमध्ये तरुणाला अडवून पाच जणांकडून बेदम मारहाण; कामावरून काढल्याच्या रागातून हल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): "तुझ्या चुकीच्या सांगण्यामुळे मला कंपनीतून कामावरून काढण्यात आले," असा जाब विचारत एका…

1 दिवस ago