महाराष्ट्र

अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता देणार, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी मिळणार, अदिती तटकरेंची घोषणा

संभाजीनगर: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी दोन मोठ्या घोषणांचा पाऊस पाडला आहे.

कुपोषण कमी करणाऱ्या अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता मिळणार

एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अंगणवाडी केंद्रांचे गुणात्मक मूल्यमापन केले जाणार आहे. या मूल्यांकनानुसार खालीलप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.

10 पैकी 7 निकष पूर्ण केल्यास ₹1400

10 पैकी 8 निकष पूर्ण केल्यास ₹1600

10 पैकी 9 निकष पूर्ण केल्यास ₹1800

10 पैकी 10 निकष पूर्ण केल्यास ₹2000

निकष कोणते

घरपोच आहार

वृद्धी संनियंत्रण क्षमता

पूर्व शालेय शिक्षण (3-6 वर्षे)

गरम व ताजा आहार

आहार-आरोग्य दिवस

पोषण उपचार व पुनर्वसन

स्थूल लठ्ठ बालकांचे प्रमाण कमी

खुजी बालकांचे प्रमाण कमी

सेवा निवृत्तीनंतर मिळणार ग्रॅच्युईटी

आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवा निवृत्ती नंतर किंवा मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना ग्रॅच्युईटी म्हणजेच एकरकमी आर्थिक सहाय्य मिळणार आहे. याबाबत लवकरच प्रस्ताव सादर होणार आहे.

ही योजना अंगणवाडी सेविकांच्या परिश्रमांना मिळालेली खरी दाद आहे.

कुपोषणमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

1 तास ago

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

15 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

15 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

15 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

15 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

20 तास ago