महाराष्ट्र

मोठी बातमी! विजय घाडगे यांना छातीत कळा, प्रकृती खालावली

लातूर: लातूरमध्ये काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकल्याच्या आरोपावरून छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत विजयकुमार घाडगे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिंमडळात रमी खेळताना व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओच्या निषेधार्थ छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लातूर दौऱ्यावर असताना त्यांच्यासमोर पत्ते भिरकावले.

त्यानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांना “हे घ्या पत्ते आणि मंत्र्यांना तुमच्या घरी पत्ते खेळायला सांगा”, असे म्हणत कोकाटेंचा निषेध केला. याच घटनेनंतर संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली.

या मारहाणीत छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे गंभीर जखमी झाले. त्यांना लातूरच्या अपोलो रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र त्यांच्या अचानक छातीत दुखायला लागल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. या मारहाणी प्रकरणी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभर निदर्शने केली.

तसेच छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुरज चव्हाण यांची पक्षातून हकालपट्टी करून विजयकुमार घाडगे यांची माफी मागावी अशी मागणी केली. घडलेल्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाराष्ट्र–ऑस्ट्रेलिया जैवउत्पादन भागीदारीला मिळणार नवी गती

‘बायोमॅन्युफॅक्चरिंग टास्क फोर्स’ स्थापन करण्याचा प्रस्ताव; तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीवर भर मुंबई: जैवतंत्रज्ञान, संशोधन, व्यापार आणि…

12 मिनिटे ago

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

14 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

14 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

14 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

17 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

18 तास ago