महाराष्ट्र

महापालिका निवडणूकांसाठी नियमावली लवकर जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी मान्य

मुंबई: दि. १ डिसेंबर २०२५ रोजी राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त यांनी बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत नगर परिषद व नगर पंचायत निवडणूकीत सुस्त असलेल्या आयोगाने अनेक आदेश निवडणूकीच्या दोन दिवसापर्यंत काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी संभ्रम निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणूकासाठी नियमावली लवकर जाहीर करण्याची मागणी मी काँग्रेस पक्षातर्फे बैठकीत केली.

अधिकारी व उमेदवार , मतदान प्रतिनिधी, मतगणना प्रतिनिधी यांच्यासाठी स्वतंत्र नियमावली माहिती पुस्तिका लोकसभा व विधान सभा निवडणूकीच्या वेळी प्रकाशित करण्यात आल्या होत्या. यंदा VVPAT नसल्याने मतदानाच्या दिवशी कार्यप्रणालीत काही बदल होतील.त्यामुळेच नवीन नियम जाहीर करणे आवश्यक आहेत. (न्यायालयाचा आदेश ही आला)

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे लेखा प्रतिनिधी( Account Agent) ची नियुक्तीची परवानगी होती तशी परवानगी महापालिका निवडणुकीत द्यावी अशी मागणी मी केली. २०१७ मध्ये सर्व्हर डाऊन झाल्याने अनेक उमेदवारांचे अर्ज व प्रतिज्ञापत्र डाऊनलोड झाले नाहीत त्याची प्रत काढता आली नाही त्यामुळे उमेदवारी अर्ज भरता आला नाही. म्हणून २०२६ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची व प्रतिज्ञापत्र सोपा करण्याची मागणी मी केली. आयोगाचे सचिव श्री.काकाणी यांनी यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

1 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

1 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

1 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

1 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

2 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

7 तास ago