मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत डिझेल खरेदी करीत असलेल्या मे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. व भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. या कंपन्यांनी दिनांक ०१.०८.२०२५ पासून लागू होणाऱ्या दरानुसार डिझेलवर सवलत (discount) देण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानुसार १ ऑगस्ट पासून या कंपन्यांनी ₹3.00 प्रति किलो लिटर (बेंचमार्क दरापेक्षा) सवलतीचा दर देण्यास सुरु केले आहे. त्यामुळे महामंडळास डिझेल खरेदीवर एकूण ₹3.00 प्रति किलो लिटर इतकी सवलत प्राप्त होणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले की ही सवलत ०१.०८.२०२५ पासून पुढे लागू झाली असून त्यामुळे महामंडळाच्या इंधन खर्चात लक्षणीय बचत होणार आहे. याचा सकारात्मक परिणाम महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर होणार असून सेवांचे सुरळीत व आर्थिकदृष्ट्या सक्षम संचालन करता येणार आहे.
या संदर्भात महामंडळाच्या सर्व विभागांनी व आगारांनी या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी, असे निर्देश मंत्री सरनाईक यांच्या कडून देण्यात आले आहेत.
(अभिजीत भोसले)
जनसंपर्क अधिकारी
मा. मंत्री परिवहन
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…