महाराष्ट्र

महामंडळातील अधिकारी-कर्मचारी यांना दिवाळी भेट; ॲड आशिष शेलार

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातील नियमित, कंत्राटी तसेच बाह्ययंत्रणेद्वारे महामंडळात प्रशासकीय कामकाज हाताळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्ताने सानुग्रह अनुदान आणि प्रोत्साहनपर अर्थसहाय्य मंजूर करण्यात आल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी गुरुवारी केली.

याबाबत श्री. शेलार यांनी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांना सूचना केली होती. श्रीमती म्हसे पाटील यांनी प्रशासनाला तत्काळ निर्देश देऊन ही बाब सकारात्मकपणे मार्गी लावली आहे. त्यामुळे महामंडळातील नियमित अधिकारी-कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान १६८०० तसेच ३० हजार दिवाळी भत्ता, कंत्राटी आणि बाह्यस्त्रोत कर्मचारी यांना १५ हजार रुपये तसेच महामंडळातर्गत कार्यरत असणाऱ्या एन.डी.स्टुडीओ येथील कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये दिवाळीनिमित्ताने मिळणार आहेत. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यामध्ये आनंदी वातावरण असून सर्वांनी आभार मानले आहेत.

नियमित अधिकारी-कर्मचारी यांच्यासह महामंडळात कार्यरत असणाऱ्या कंत्राटी अधिकारी कर्मचारी आणि बाह्यस्त्रोत कर्मचारी यांचा महामंडळाच्या व्यवसाय विकासात महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे दिवाळीनिमित्ताने नियमित अधिकारी-कर्मचारी यांना सानुग्रह अनुदानासह इतर कर्मचाऱ्याना प्रोत्साहनपर अर्थसहाय्य मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिक्रापुर पोलिसांचा बीडमध्ये छापा; साडेचार लाखांचे दागिने हस्तगत, एक आरोपी गजाआड

शिरुर (तेजस फडके) ‘तुमच्याकडील सोन्यापेक्षा हे बिस्कीट अधिक वजनाचे आहे,’ असे भासवून महिलेचा विश्वास संपादन…

8 तास ago

सहकार वाचवण्याचे मोठे आव्हान; सत्ताधारी सहकाराचे नाही तर ‘स्वाहाकाराचे’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…

9 तास ago

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

1 दिवस ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

1 दिवस ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

1 दिवस ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

1 दिवस ago