महाराष्ट्र

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. ब्रिटनच्या संसदेत ९ आणि १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये एकनाथ शिंदे यांचा तीन पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे. यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे आज लंडनला रवाना झाले.

ब्रिटिश संसदेतील हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ सोहळ्यात शिंदे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानंतर १० सप्टेंबर रोजी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आयोजित ‘इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह २०२६’मध्ये त्यांना ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’ देण्यात येणार आहे. तसेच लंडनच्या महाराष्ट्र मंडळातर्फे त्यांना ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

तीन योजनांची विशेष दखल

शिंदे मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून राबवलेल्या नागरिक-केंद्री, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासन पद्धतीची या सन्मानासाठी विशेष दखल घेण्यात आली आहे. यामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ या तीन योजनांचा प्रामुख्याने समावेश आहे.

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, नागरिकांना शासकीय सेवा थेट उपलब्ध करून देणे तसेच तरुणांना कामाचा अनुभव आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या योजना राबवण्यात आल्या आहेत.यूके एशियन बिझनेस कौन्सिलच्या म्हणण्यानुसार, हा सन्मान प्रशासकीय कार्यक्षमता, महिला सक्षमीकरण आणि थेट लाभ हस्तांतरण या क्षेत्रातील कामगिरीच्या आधारे देण्यात येत आहे.

ब्रिटिश संसदेत मांडणार महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन

१० सप्टेंबर रोजी इंडो-युरोपियन बिझनेस फोरम आणि वर्ल्ड लीडरशिप फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ‘इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह २०२६ : ग्लोबल बिझनेस अँड इन्व्हेस्टमेंट डायलॉग’ आयोजित करण्यात आला आहे. या परिषदेसाठी एकनाथ शिंदे यांना मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.

या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर शिंदे हे महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन आणि भारत-यूके आर्थिक संबंधांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. नगरविकास, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील महाराष्ट्राच्या कामगिरीबाबतही ते आपले विचार मांडणार आहेत.

या कार्यक्रमांना ब्रिटिश संसद सदस्य, वरिष्ठ मंत्री, महापौर, विविध देशांचे राजदूत, जागतिक उद्योजक आणि कॉमनवेल्थ देशांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यामुळे महाराष्ट्र आणि ब्रिटनमधील व्यापार, उद्योग आणि गुंतवणुकीच्या संबंधांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

लंडनच्या महाराष्ट्र मंडळातही होणार गौरव

लंडन दौऱ्यात उपमुख्यमंत्री शिंदे महाराष्ट्र मंडळाच्या महाराष्ट्र भवनालाही भेट देणार आहेत. सुमारे ९४ वर्षांचा इतिहास असलेल्या महाराष्ट्र मंडळात त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक योगदानाबद्दल ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.यावेळी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ यांसह महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी केलेल्या कामाचा विशेष उल्लेख केला जाणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

3 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

3 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

3 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

8 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

9 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

10 तास ago