महाराष्ट्र

पेट्रोल पंप कसा सुरू कराल? गुंतवणूक किती, कसा मिळवाल परवाना आणि मग बक्कळ नफा

औरंगाबाद: स्वतःचा मोठा, विश्वासार्ह आणि कायम चालणारा व्यवसाय सुरू करायचा विचार करताय का? एकदा उभा केला की वर्षानुवर्षे स्थिर उत्पन्न देणारा बिझनेस हवा आहे का? मग पेट्रोल पंप व्यवसाय हा तुमच्यासाठी सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो

व्यवसायाचे स्वरूप आणि कंपन्या

सरकारी कंपन्या (PSU)

IOCL – इंडियन ऑइल

BPCL – भारत पेट्रोलियम

HPCL – हिंदुस्थान पेट्रोलियम

खाजगी कंपन्या

Nayara Energy (पूर्वीची Essar)

Jio-bp (Reliance)

Shell

पात्रता (Eligibility)

वय – 21 ते 60 वर्षे

शिक्षण

ग्रामीण भाग: किमान 10 वी उत्तीर्ण

शहरी भाग: किमान 12 वी उत्तीर्ण (पदवीधरांना प्राधान्य)

नागरिकत्व – अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक

पेट्रोलपंपसाठी जागा कुठे असावी

नॅशनल हायवे

स्टेट हायवे

मुख्य जिल्हा किंवा शहर रस्ता

जागेचा आकार

शहरी भाग – 800 ते 1200 चौ. मीटर

हायवे – 1200 ते 2000 चौ. मीटर किंवा त्यापेक्षा अधिक

जागा समतल (Level) असावी

त्या जागेत विजेचे खांब, मोठी झाडे कमी असावीत

जागा स्वतःच्या नावावर किंवा दीर्घकालीन लीजवर असावी

गुंतवणूक आणि खर्च

गुंतवणूक कंपनी व ठिकाणानुसार बदलते

ग्रामीण भाग – 15 लाख ते 25 लाख रुपये

शहरी / हायवे – 50 लाख ते 2 कोटी रुपये (जागेचा खर्च वेगळा)

बँक बॅलन्स

FD, Savings Account किंवा Shares स्वरूपात ठराविक रक्कम दाखवावी लागते

आवश्यक परवाने (Licenses & NOC)

जिल्हाधिकारी (Collector) NOC

NHAI NOC (हायवेवरील जागेसाठी)

NA परवाना – शेतजमीन असल्यास बिगर शेती

Fire Department Certificate

PESO License – पेट्रोलियम व स्फोटक सुरक्षा

Pollution Control Board Certificate

अर्ज करण्याची प्रक्रिया

कंपन्यांकडून वर्तमानपत्र किंवा वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध केली जाते

अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो

https://www.petrolpumpdealerchayan.in

अर्जदार जास्त असल्यास लॉटरी पद्धतीने निवड

निवडीनंतर जागेची तपासणी (FVC)

सर्व काही योग्य असल्यास LOI – Letter of Intent दिले जाते

कमाई आणि नफा

पेट्रोल विक्रीवर – ₹2.50 ते ₹3.50 प्रति लिटर

डिझेल विक्रीवर – ₹1.80 ते ₹2.50 प्रति लिटर

पेट्रोलपंपवर अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग

हवा भरणे

इंजिन ऑइल विक्री

मिनी कॅफे / स्टोअर

जाहिराती व बॅनर्स

योग्य ठिकाण, जास्त वाहनांची वर्दळ आणि उत्तम व्यवस्थापन असल्यास

महिन्याला 2 ते 3 लाख रुपयांपर्यंत निव्वळ कमाई शक्य आहे. पेट्रोल पंप व्यवसाय म्हणजे एकदा मेहनत, आणि पुढील अनेक वर्षे स्थिर उत्पन्नाचा भरोसा

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

47 मिनिटे ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…

51 मिनिटे ago

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…

56 मिनिटे ago

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

4 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

13 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

13 तास ago