महाराष्ट्र

लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करा…

पुणे: जगभरात देशाचे नाव चमकवणार्‍या सुमारे ३० भारतीय महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनी त्यांचे वारंवार लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. यात बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांच्या नेतृत्वाखाली जवळपास ३० कुस्तीपटूंनी जंतरमंतर मैदानावर (दि. १८) जानेवारी, २०२३ रोजी निदर्शने देखील सुरु केली आहेत.

या पार्श्वभूमीवर अशा घटना भविष्यात पुन्हा पुन्हा घडू नयेत या उद्देशाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्रीय क्रीडामंत्री मा. अनुराग ठाकूर यांना एक पत्र पाठवले आहे. त्यात क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करुन चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी केली आहे.

या घटनेच्या अनुषंगाने त्यांनी पुढील मागण्या केंद्रीय क्रीडा मंत्री यांच्याकडे केल्या आहेत.

1. केंद्रीय क्रीडा व राज्याच्या क्रीडा विभागात लैंगिक शोषणाच्या घटना थांबविण्यासाठी विशाखा समिती स्थापन करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात.

२.महिला खेळाडूसाठी प्रत्येक ठिकाणी महिला प्रशिक्षकच नेमावेत, याबाबत दक्षता घेण्याबाबत निर्देशित करावे.

३. प्रत्येक राज्याच्या स्तरावर एक समिती स्थापन करून क्रीडा प्रकारानुसार उपसमित्या स्थापन करुन असे प्रकार राज्यात होणार नाहीत याबाबत खबरदारी घ्यावी.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही या सर्व सूचना लागू व्हाव्यात अशी अपेक्षा डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

5 तास ago

प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मान मिळणे गरजेचे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…

5 तास ago

शिरुर; शेतीपंपांच्या रात्रीच्या वीज वेळापत्रकात बदल करण्याची शेतकऱ्यांची मागणी; दिवसा ८ तास अन रात्री ६ तास वीज

बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…

6 तास ago

चार महिन्यांतच संसाराचा दुर्दैवी अंत; २४ वर्षीय विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय

चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…

11 तास ago

मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…

11 तास ago

ओव्हरटेकच्या नादात २.५ कोटींच्या SUVची दुचाकीला धडक; एका पार्सलसाठी घराबाहेर पडला अन् परतलाच नाही

मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…

11 तास ago