महाराष्ट्र

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत JSPM पॉलिटेकनिकचा एकाच दिवशी ९ पदकांचा ऐतिहासिक विक्रम

वाघोली: महाराष्ट्र राज्य आंतर महाविद्यालयीन तंत्रनिकेतन क्रीडा स्पर्धा (IEDSSA 2026) मध्ये (JSPM) जेएसपीएम भिवराबाई सावंत पॉलिटेकनिक, वाघोलीच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत एकाच दिवसात तब्बल ९ पदके जिंकण्याचा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. या अभूतपूर्व यशामुळे संपूर्ण शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात संस्थेचा नावलौकिक झाला आहे.

दि २३ जानेवारी २०२६ रोजी ‘समर्थ पॉलिटेकनिक’, बेल्हे येथे पार पडलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातील नामांकित तंत्रनिकेतन संस्थांमधील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या कठीण आणि चुरशीच्या स्पर्धेत जेएसपीएम भिवराबाई सावंत पॉलिटेकनिकच्या खेळाडूंनी आपली गुणवत्ता, मेहनत आणि जिद्द सिद्ध करत घवघवीत यश संपादन केले.

धावपटूंनी गाजवल मैदान…

रिले व वैयक्तिक प्रकारांत पदकांची लयलूट करताना रिले स्पर्धेत महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने उत्कृष्ट सांघिक समन्वय दाखवत द्वितीय क्रमांक पटकावला. या संघामध्ये

शुभांगी केंद्रे, रोशनी गायकवाड, दुर्गा काळुरे आणि वैष्णवी खुले या विद्यार्थिनींचा समावेश होता.इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाची विद्यार्थिनी शुभांगी केंद्रे हिने आपल्या अष्टपैलू क्रीडा कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने

लांब उडी- प्रथम क्रमांक,

१०० मीटर धावणे- द्वितीय क्रमांक,

२०० मीटर धावणे- द्वितीय क्रमांक

अशी दैदीप्यमान कामगिरी करत एकाच स्पर्धेत अनेक पदकांवर आपले नाव कोरले.

विद्युत विभागाचा विद्यार्थी शुभम आराख याने सहनशक्ती आणि वेग यांचा उत्तम मेळ साधत ४०० मीटर धावणे- प्रथम क्रमांक तसेच ८०० मीटर धावणे- प्रथम क्रमांक पटकावत दुहेरी सुवर्णपदकाची कमाई केली. तसेच समीक्षा अभंग- उंच उडी (द्वितीय क्रमांक), सत्यजित केसवड- तिहेरी उडी (द्वितीय क्रमांक) यांनीही पदके जिंकत संस्थेच्या यशात मोलाची भर घातली.

संस्थेच्या यशामुळे मान्यवरांचा अभिनंदनाचा वर्षाव…

या ऐतिहासिक यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव प्रा डॉ तानाजी सावंत, उपाध्यक्ष गिरीराज सावंत आणि विश्वस्त ऋषीराज सावंत यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे मनःपुर्वक अभिनंदन केले.वाघोली संकुलाचे संकुल संचालक डॉ. वसंत बुगडे, सहसंचालक एस. के. वाकचौरे आणि प्राचार्य डॉ प्रदीप काळे यांनीही विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक करत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

मार्गदर्शक प्राध्यापकांचे मोलाचे योगदान

या यशामागे महाविद्यालयाच्या प्राध्यापक व क्रीडा विभागाच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाचा मोठा वाटा असल्याचे नमूद करण्यात आले.शैक्षणिक गुणवत्तेसोबत क्रीडा क्षेत्रातही जेएसपीएम भिवराबाई सावंत पॉलिटेकनिकची भक्कम घोडदौड सुरु असल्याचे या यशाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

JSPM च्या डीन डॉ वैशाली दाभाडे, विभागप्रमुख प्रा नामदेव भुतेकर,प्रा संदीप पोखरकर, सोनाली गायकवाड, मोनिका काश्मिरे, डॉ महेश यादव, प्रा दत्तात्रय शिंदे, विनायक मस्के,क्रीडा प्रमुख प्रा राहुल डावखर, क्रीडा सहाय्यक प्रा महेश वाघमोडे, प्रा सागर गायकवाड, प्रा आविष्कार शिंदे, प्रा स्नेहल कणसे आणि अतुल कवठे यांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झाल्याने त्यांच्यावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

13 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

19 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

19 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

20 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

20 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

20 तास ago