महाराष्ट्र

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भीमाशंकर दौरा आटोपून परतताना नियोजित कार्यक्रम नसतानाही थेट आंबेगावचा रस्ता धरत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या निवासस्थानी अचानक भेट दिली. या भेटीनंतर आढळराव पाटील पुन्हा एकदा शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत ‘स्वगृही’ परतणार का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

एकनाथ शिंदे सोमवारी भीमाशंकर दौऱ्यावर आले होते. दौरा आटोपल्यानंतर परतीच्या प्रवासात त्यांनी अचानक आपला ताफा आंबेगावच्या दिशेने वळवला. त्यानंतर शिंदे थेट शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या या अनपेक्षित भेटीमुळे पुणे जिल्ह्यातील राजकीय चर्चांना नवा रंग आला आहे.

या भेटीनंतर आढळराव पाटील यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्टही चर्चेचा विषय ठरली. ‘क्षण आनंदाचा, क्षण जिव्हाळ्याचा!’ असे म्हणत त्यांनी शिंदेंच्या भेटीबद्दल भावना व्यक्त केल्या. ‘साहेब, आपल्या आमच्या गृही आगमन होणे हा आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. आपले नेतृत्व आणि आपुलकी मला सदैव ऊर्जा देत राहील,’ असे आढळरावांनी म्हटले आहे.

आढळरावांच्या या पोस्टमुळे त्यांच्या आगामी राजकीय भूमिकेबाबत चर्चांना आणखी वेग आला आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांचे राजकीय संबंध जुने आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आढळरावांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता.

मात्र, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिरूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्यानंतर आढळरावांनी शिंदेंची साथ सोडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. मात्र या निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी आढळरावांचा पराभव केला.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आढळराव काहीसे सक्रिय राजकारणापासून दूर असल्याचे चित्र होते. सध्या ते म्हाडाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. अशातच शिंदेंनी त्यांच्या घरी दिलेल्या अचानक भेटीमुळे आढळराव पुन्हा पुणे जिल्ह्याच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

दरम्यान, एकनाथ शिंदे सध्या शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा परिस्थितीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील एखादा मोठा चेहरा शिंदेंच्या संपर्कात आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.शिंदे-आढळराव भेट ही केवळ सदिच्छा भेट होती की आगामी राजकारणाची नवी ‘स्क्रिप्ट’? याचे उत्तर सध्या स्पष्ट नसले, तरी या भेटीने पुणे जिल्ह्यातील राजकीय चर्चांना नक्कीच उधाण आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिसांच्या डि बी पथकाची धडाकेबाज कामगिरी; दोन म्हशी, दोन बैल आणि पिकअप वाहन असा ५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत पशुधन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शिरुर पोलिसांच्या…

3 तास ago

शिरुर शहरात नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांचा दणका; २५७ केसेस, तब्बल ३ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

शिरुर (तेजस फडके): वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करणे हि प्रत्येक चालकाची जबाबदारी असते. मात्र…

3 तास ago

सावधान, ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, या आजारांचा धोका

पूर्वीच्या काळी लोक अशी कामं करत असत ज्यात शरीराला जास्त मेहनत करावी लागत असे. पण…

11 तास ago

घसा सारखा खवखवतो, सतत घशात इन्फेक्शन? ५ उपाय, आजारी झोपून राहाव लागणार नाही

घसा खराब होणे, सोलवटल्यासारखे वाटणे आणि खाताना त्रास होणे हे अनेकदा बदलत्या हवामानामुळे, गरम-थंड पदार्थ…

11 तास ago

हृदयविकार काही घरगुती उपाय

आहार: सकाळचा नाश्ता: फळे, भाज्या, कडधान्ये आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. मीठाचे…

11 तास ago

‘लेबल खोटं बोललं तरी ग्राहकाला किंमत मोजावी लागते’; तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांना सज्जड इशारा

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) धडाकेबाज कारवाईमुळे राज्यातील भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या…

12 तास ago