महाराष्ट्र

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन

जळगाव: खान्देशातील नाट्य क्षेत्रात तब्बल पाच दशकांची वाटचाल असणारे जळगावच्या रंगभूमीवरुन व्यावसायिक रंगभूमीवर जाणाऱ्या अनेक कलावंतांना घडविणारे, सृजनशील लेखक दिग्दर्शक डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या १२ नाटकांच्या संहिताचे पुस्तकरुपाने ३ खंडात प्रकाशन आज (दि.३०) रोजी संपन्न होत आहे.

सोमवार दि.३० जून रोजी सायंकाळी ६ वाजता व.वा. वाचनालयाच्या रामनारायण अग्रवाल सभागृहात होणाऱ्या या पुस्तकांचे प्रकाशन प्रयोगशील नाट्य निर्माते अद्वैत थिएटरचे सर्वेसर्वा राहुल भंडारे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या पुस्तकाचे प्रकाशन श्रेयस प्रकाशनातर्फे करण्यात येत आहे.

नाट्य या विषयावर पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी मिळविणारे व खान्देशातील रंगभूमीवर परिचित असणाऱ्या डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या मुशीतून तयार झालेले अनेक कलावंत आज व्यावसायिक नाटक, मालिका यातून भूमिका करत असून, जळगावच्या हौशी रंगमंचावरदेखील त्यांचे काही विद्यार्थी कार्यरत आहे. हेमंत कुलकर्णी यांनी आपल्या पाच दशकांच्या नाट्यप्रवासात ३५ हून अधिक नाटके तर ५० हून अधिक एकांकिकांचे लेखन केले आहे.

नाट्यलेखनाव्यतिरिक्त प्रहसने, नभोनाट्ये, संशोधन पत्र, वृत्तपत्रीय लेखन केलेले आहे. यातील निवडक अशा ७ आनंदाश्रम, बातमी तशी जूनी पण, दास्ताँ, हम दो No, मुसक्या, वेग्गळं असं काहितरी, तेरे मेरे बीच में, नाना भोळे १२ शनिपेठ, पुन्हा तुर्क पुन्हा अर्क, अघटित, नेने विरुध्द शून्य, अनादी मी या १२ नाटकांचे तीन खंडात प्रकाशन होत आहे. यातील बहुतांश नाटकांनी व एकांकिकांनी महाराष्ट्रातील हौशी रंगभूमी गाजवली आहे. तरी या नाट्यसंहितांच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.हेमंत कुलकर्णी, रंगशाळा जळगाव व श्रेयस प्रकाशन यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

53 मिनिटे ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

57 मिनिटे ago

शिंदे गटाला निकालाआधीच टेन्शन? ‘धनुष्यबाण ठाकरेंनाच मिळणार’; असीम सरोदे यांचा मोठा दावा

मुंबई: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, आजपासून शिंदे…

1 तास ago

अष्टविनायक यात्रा म्हणजे श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम; जाणून घ्या आठही गणरायांचे महत्त्व

Pपुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीगणेशाची आठ…

1 तास ago

धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणाऱ्यांवर शिंदेंची खरमरीत टीका; ‘उबाठा’वर निशाणा

नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९…

2 तास ago

राज्यभरात २९ सप्टेंबरला ‘रोजगार महाकुंभ’; महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा; चंद्रकांत पाटील

मुंबई: राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी…

2 तास ago