महाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; संभाजीनगरचे 6 जणांचा जागीच मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी..

औरंगाबाद: समृद्धी महामार्गावर मोठा अपघात झाला आहे. मेहकर-सिंदखेडराजा दरम्यान (जि. बुलढाणा) लोणार तालुक्यातील शिवणी पिसा नजीक इर्टिगा गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहाजण जागीच ठार झाले. तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जखमी तसेच मृत हे छत्रपती संभाजीनगरमधील एन-11 मधील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच सहाजण जागीच ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत छत्रपती संभाजीनगरचे

हा अपघात रविवारी सकाळी लोणार तालुक्यातील शिवणी पिसा ते दुसरबीड दरम्यान घडला. भरधाव वेगातील इर्टिगा गाडी ही रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरमध्ये घुसली व तीन ते चार पलट्या मारून दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर उलटली. अपघातग्रस्त ईर्टीगाचा क्रमांक एम एच 20 – 8962 आहे. एन-11 द्वारकानगरचे रहिवासी असून एमएसईबीचा कर्मचारी आहे. ते त्यांच्या कुटुंबासह देवदर्शनासाठी समृद्धी महामार्गावरून जात होते.

समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या घटना

जालना येथील निधोना इंटरचेंजजवळ ट्रक उलटल्याने अपघात.

वाशिममध्ये केनवड येथे गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने अपघात.

संभाजीनगर जिल्ह्यातील घायगाव शिवारात धावत्या कारने अचानक पेट घेतला.

नागपूर जिल्ह्यातील टोलनाक्याजवळच दोन कारचा अपघात, अपघातात गाडीचा अक्षरशः चुराडा.

जालना जिल्ह्यातील सोमठाण्याजवळ कार लोखंडी खांबाला धडकली.

पिंप्रीमाळी (जि. बुलढाणा) परिसरात दुभाजकाच्या खड्डयात ट्रक उलटून अपघात.

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे लग्नवन्हाडाच्या कारचा टायर फुटल्याने अपघात.

सिंदखेडराजा तालुक्यात झालेल्या कार अपघातात बालकासह तीनजण जखमी.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बहिणीच्या डोळ्यांसमोर भावाची पंचगंगेत उडी; रक्षाबंधनाची राखी हातातच

कोल्हापूर: घरगुती वादातून रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या ३२ वर्षीय तरुणाने बहिणीच्या डोळ्यांसमोर रुई येथील पंचगंगा…

5 तास ago

‘कुणाचाही हक्क न काढता मराठा समाजाला न्याय देणार’; शिंदेंचा निर्धार, परभणीत उबाठाला मोठा धक्का

परभणी: मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि इतर सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक…

5 तास ago

खासगी विद्यापीठांच्या शुल्कावर नियंत्रण आणा; अन्यथा रस्त्यावर उतरू!

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ॲड. अमोल मातेले यांचा सरकारला इशारा; ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ म्हणत जोरदार…

6 तास ago

शिर्डीत पराभव झाला नसता तर आजही शरद पवारांसोबत असतो; रामदास आठवले यांची खंत

पवारांसोबत राहिलो असतो तर नुकसान झाले असते; खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात जुन्या राजकीय आठवणींना उजाळा…

22 तास ago

डीसीसी निवडणुकीत भाजपची ताकद वाढणार? सुभाष देशमुखांचा ठराव; शहाजी पवारही मैदानात

सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून…

22 तास ago

भावाची प्रकृती पाहण्यासाठी गेले; भेट ठरली अखेरची! एकाच दिवशी सख्ख्या भावांचा मृत्यू

निलंगा : भावाची प्रकृती खालावल्याचे समजताच त्याची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या धाकट्या भावाची ती भेटच दोघांची…

22 तास ago