महाराष्ट्र

माफ करा आई- बाबा नाही झेपणार मला…

नागपूर: माफ करा आई बाबा नाही झेपणार मला… दीड आठवड्यांपासून वाटत होते, मी नाही करू शकणार… सॉरी…आणि धन्यवाद मला प्रत्येक गोष्ट वेळेत दिल्याबद्दल… माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे आई- बाबा… पण बस्स… आता नाही होणार माझ्याकडून… बाय..

अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या भावना आहेत, पंख्याला दोर लावत गळफास घेऊन जीवनयात्रा संपवलेल्या एका निरागस मुलाच्या… ख्वाहिश देवराम नागरे (वय १६) असे या पौगंडावस्थेतील मुलाचे नाव. धड मिसुरडेही न फुटलेल्या या मुलाने हृदयात जपलेल्या लाखो ‘ख्वाहिश’वर पाणी फिरवत मृत्यूला करकचून मिठी मारत असताना अपेक्षांचे ओझे लादणाऱ्या लाखो पालकांना खडबडून जागे केले आहे. ख्वाहिश हा कॅनल रोडवरील फिजिक्सवाला विद्यापीठ या खासगी ट्यूशन क्लासेसचा विद्यार्थी होता.

मृत्य़ूला मिठी मारण्याच्या अगदी काही सेकंदापूर्वी ख्वाहिशने मित्रांसोबत खालच्या माळ्यावरील मेसमध्ये जेवण केले होते. सकाळी ११ च्या दरम्यान तो खोलीत शिरला तो कायमचा… त्याच्या अगदी काही क्षणापूर्वी आई- बाबांच्या नावे ख्वाहिशने एक चिठ्ठी पलंगावर लिहून ठेवली. त्यातला मजकूर खडबडून जागे करणारा आहे. या चिठ्ठीत ख्वाहिशने जे लिहिले त्यावर नुसती नजर फिरविली तरी मन सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला एकदा भेटण्याची इच्छा होती… पण नाही भेटू शकणार…माफ करा… तुम्ही रडू नका… मी जे करतोय ते स्वतःहून…

ख्वाहिश हा देखील पालकांच्या अशाच अवास्तव अपक्षांचे ओझे वाहणाऱ्या मुलांपैकीच एक होता. तळहातावरच्या फोडा प्रमाणे जपलेले आपले लेकरू जीवघेणी स्पर्धा सहन करू शकेल का, त्याला हे झेपणार आहे का…याचा विचार पालकांनी पुन्हा एकदा करणे गरजेचे झाले आहे.

हुंदके, उसासे आणि डोळ्यांना धारा…

मृत्यूला मिठी मारण्याच्या अगदी काही मिनिटांपूर्वी ख्वाहिशने खोलीतल्या अन्य मित्रांसोबत खाणावळीत जेवण केले. अन्य मुले खाली जेवत असताना कोणाच्याही ध्यानी मनी नसताना ख्वाहिश खोलीत गेला आणि त्याने दरवाजाला आतून कडी घातली. बराच वेळ तो खोलीचे दार उघडत नसल्याने मुलांनी लाथ मारून दरवाजा तोडला आणि समोरचे दृष्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. दुपारपर्यंत अख्ख्या वसतीगृहात हुंदके आणि उसासेच कानी पडत होते.

खाटेवरचा फोन, टेबलवरचे घड्याळ अनाम हुंदक्यांचे मुक साक्षीदार

ज्या क्षणी ख्वाहिशने मृत्यूला कवटाळले त्या क्षणी त्याच्या खाटेवरचा फोन… शेजारी पडलेली वही… उशाला ठेवलेली बॅग आणि अभ्यासाच्या टेबलवरचे गजर करणारे घड्याळ ख्वाहिशच्या अनाम हुंदक्यांचे मुक साक्षीदार बनले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

15 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

19 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

19 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

19 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

19 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

19 तास ago