महाराष्ट्र

तोंडवली येथे अक्षरोत्सव प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

तळेरे: या सगळ्या मान्यवरांपर्यंत तू पोहचलास, अशीच खूप माणसे जमव, माणसे जोड आणि तुझा हा संग्रह असाच मोठा होवो, समृध्द होत जावो, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंत सावंत यांनी केले. ते तोंडवली येथील सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीच्या विद्यानगरी मध्ये आयोजित केलेल्या अक्षरोत्सव या संदेश पत्रांच्या प्रदर्शन कार्यक्रमात बोलत होते.

या प्रदर्शनाचे उद्घाटन सेवानिवृत्त विक्रीकर अधिकारी चंद्रकांत लाड यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंत सावंत, सचिव निखिल सावंत, पोर्ट ट्रस्ट मधील सेवानिवृत्त अधिकारी दिगंबर राणे, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक यल्लाप्पा गुंडू दड्डीकर, सेवानिवृत्त पोलिस उमहानिरीक्षक बाळासाहेब गिरी, माझगाव डॉक चे सेवानिवृत्त कर्मचारी प्रदीप गवळी, मुंबई येथील व्यावसायिक सुरेश आदाते, मुंबई पोर्ट ट्रस्ट चे सेवानिवृत्त अधिकारी बाळकृष्ण जाधव, प्रशासकीय अधिकारी प्रा. विनायक चव्हाण, फार्मसी कॉलेज चे प्राचार्य डॉ. तुकाराम केदार, अक्षरोत्सव प्रमुख निकेत पावसकर यांच्यासह सर्व प्राचार्य यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. मान्यवरांसह सर्वांनीच या संग्रहाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.यावेळी डी. फार्मसी, बी. फार्मसी, बी. एस्सी. नर्सिंग, आर. ए. एन. एम. नर्सिंग आणि कृषी महाविद्यालयाच्या असंख्य विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन उत्सुकतेने पाहिले.

या परदेशी व्यक्तींची पत्रे संग्रहात

या संग्रहामध्ये जागतिक किर्तिचा खेळाडू, टेनिसच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड), मुहम्मद युनुस (बांग्लादेश), आयर्लंड देशाचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर, युरोपियन सेन्ट्रल बँकेचे चेअरमन मारिओ ड्राघी (जर्मनी), हॉलीवूड निर्माता अभिनेता दिग्दर्शक सर मायकेल केन (लंडन), अभिनेता जॅकी चेन, अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री कँरोल अल्ट, मॉडेल-अभिनेत्री-गायिका-नृत्यांगना आणि प्राणीमित्र ब्रिगेट बार्दोत (पॅरीस), वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रिमीयर मार्क मँकगोवन, सुप्रसिध्द टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफ, नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अभिजित बॅनर्जी (अमेरिका) या परदेशी व्यक्तींच्या पत्रांचा समावेश आहे.

याचवेळी कणकवली येथील गुरुकृपा हॉस्पिटलच्या डॉ. प्रवीण बिरमोळे, रत्नागिरी येथील शासकीय फार्मसी कॉलेजचे फार्मसीचे विभागप्रमुख डॉ. एच. एन. गुप्ता, रत्नागिरी येथील पॉलिटेक्निक कॉलेजचे प्रा. डॉ. ए. एस. सावली यांनीही या प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्न विचारून या संग्रहाबाबत अधिकाधिक माहिती जाणून घेतली.

राज्यात विविध ठिकाणी प्रदर्शने

निकेत पावसकर यांच्याकडील देश परदेशातील मान्यवरांच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांची प्रदर्शने राज्यात आणि राज्याबाहेर विविध ठिकाणी झाली आहेत. यापूर्वी बेळगाव, दादर, मुलुंड, कोल्हापूर, प्रभानवल्ली, शिरोडा अशा विविध 20 ठिकाणी प्रदर्शने झाली असून त्याला उदंड प्रतिसाद मिळाला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

6 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

6 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

7 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

22 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

22 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

22 तास ago