महाराष्ट्र

शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करा… घरगुती गॅस दरवाढ करणार्‍या सरकारचा धिक्कार असो

वीज आणि गॅस दरवाढीविरोधात महाविकास आघाडीचे आमदार तिसऱ्या दिवशी आक्रमक…

मुंबई: शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करा… घरगुती गॅस दरवाढ करणार्‍या सरकारचा धिक्कार असो… शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो… शेतकऱ्यांची वीज तोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… शेतकऱ्यांना १२ तास वीज द्या नाहीतर खुर्च्या खाली करा… वीजेवाचून पंप नाही पंपावाचून पीक नाही,पिकावाचून मरतोय शेतकरी ,सरकारला देणं घेणं नाही… शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळालीच पाहिजे… शिंदेसरकारने केलं काय, जाहिरातीशिवाय दुसरं काय… पिकाला नाही पाणी, मालाला नाही भाव, अरे सरकारा कधीतरी बळीराजाला पाव… महाराष्ट्राची बत्ती गुल, खोके सरकारचे खिसे फूल… अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत आजही शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी कांदा आणि कापसाच्या मुद्दा लावून धरल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी वीजेच्या आणि गॅस दरवाढ प्रश्नावर महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झालेले पहायला मिळाले. चोर मचाये शोर अशा आशयाचे बॅनर फडकवून वीज प्रश्नावर आघाडी सरकारच्या काळात आंदोलन करणार्‍या आमदार प्रसाद लाड, राम सातपुते, प्रवीण दरेकर यांचा निषेध करण्यात आला.

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आजही महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारला सळो की पळो करून सोडले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कोंढापुरीत तरुणावर चाकूने वार करत खून; शिक्रापुर पोलिसांनी १२ तासांत आरोपीच्या आवळल्या मुसक्या

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील कोंढापुरी येथे आज बुधवार (दि २१) रोजी सकाळी सातच्या सुमारास…

22 तास ago

घोड धरणातील वाळूमाफियां विरोधात वडगाव-शिंदोडी ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

श्रीगोंदा (विशेष प्रतिनिधी) घोड धरणाच्या बॅकवॉटरमध्ये गेल्या पाच वर्षांपासून रात्रंदिवस बेकायदशीर वाळू उपसा सुरु असून,…

1 दिवस ago

शिरुर पोलिस ऍक्शन मोडवर ‘राजहंस लॉज’ वर छापा टाकत अनधिकृत ‘वेश्या’ व्यवसाय प्रकरणी एका पत्रकारासह दोघांना अटक

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथील राजहंस लॉजमध्ये महिलेकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची…

1 दिवस ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित शिवसेनेचा दसरा मेळावा; मदतीसाठी राज्यव्यापी कार्यक्रमाची घोषणा होणार

मुंबई: राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा संकटग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित केला आहे. गोरेगाव येथील…

3 दिवस ago

दुष्काळग्रस्त गावांसाठी स्वतंत्र सूक्ष्म कृती आराखडे तयार करा

धाराशिव जिल्ह्यातील पाणी, चारा टंचाईवर उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश धाराशिव: जिल्ह्यातील…

3 दिवस ago

टायगर श्रॉफच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे वांद्र्यात; कलाकारांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे निर्देश

मुंबई: बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर आज संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली. या…

3 दिवस ago