महाराष्ट्र

पुण्यातील त्या महिलेवर लैंगिक अत्याचार, गरोदर राहिली पण…

पुणे: पुण्यात एका महिलेसोबत सतत शारीरिक संबंध प्रस्थापित करून नंतर प्रियकराकडून तिची फसवणूक करण्यात आली. पीडितेला तिच्या प्रियकराने लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्यावर अत्याचार केल्याची बातमी समोर आली आहे.

वारंवार शारीरिक संबंध ठेवल्यामुळे पीडिता गरोदर राहिली मात्र, नंतर तिच्या आवडत्या खाद्यपदार्थातून तिला गर्भपाताचं औषध देण्यात आलं आणि गर्भपात करण्यात आला. खिडकी पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.

लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील 32 वर्षीय आरोपीचं नाव विनय सुनील खिल्लारे उर्फ मोनू असं आहे. आरोपीने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि तिला लग्नाचं आमिष दाखवल्याचा आरोप आहे. विनयने प्रेयसीसोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तिच्यावर अत्याचार केला. सततच्या शारीरिक संबंधामुळे पीडिता गरोदर राहिली. संबंधित महिला 38 वर्षीय असल्याची माहिती समोर आली आहे.

खाद्यपदार्थातून गर्भपाताचं औषध

तरुणी गरोदर असल्याचं कळताच आरोपीने तिचा गर्भपात घडवून आणण्याचं ठरवलं. त्याने पीडितेच्या आवडत्या खाद्यपदार्थात गर्भपाताच्या गोळ्या मिसळल्या आणि ते तिला खायला दिलं. यानंतर तिच्याशी लग्न न करता आरोपीने तिची फसवणूक केली. प्रियकराने आपली फसवणूक केल्याचं लक्षात येताच पीडितेने खडकी पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. तसेच पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती मिळाली आहे.

फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल

प्रकरणातील आरोपीने महिलेला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास सुरूवात केली. वारंवार शारीरिक संबंध ठेवल्यामुळे पीडिता गरोदर राहिली. मात्र, त्यावेळी पीडितेची फसवणूक करत आरोपीने तिच्या आवडत्या खाद्यपदार्थांमधून तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर तिच्याशी लग्न न करता तिची फसवणूक केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिसांची तत्परता; हरवलेली वृद्धाची बॅग एका तासात शोधून केली स्वाधीन

शिरुर (तेजस फडके) एका वृद्ध व्यक्तीची हरवलेली बॅग तत्परतेने शोधून अवघ्या एका तासात संबंधित व्यक्तीच्या…

15 तास ago

फडणवीसांइतकेच विलासराव देशमुखही माझे आवडते मुख्यमंत्री; मुरलीधर मोहोळांचं मोठं वक्तव्य

पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…

20 तास ago

शेरखान शेख यांनी लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन!

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…

22 तास ago

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…

24 तास ago

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

2 दिवस ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

2 दिवस ago