महाराष्ट्र

रांजणगावच्या यात्रेत कारचा अपघात झाला अन्…; आदेश बांदेकरांनी सांगितला काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग

पुणे: आजपासून गणेश चतुर्थीला सुरुवात झाली आहे. सर्वत्र उत्साहात गणपती बाप्पाचं आगमन झालंय. लहान घरापासून आलिशान बंगल्यात अनेक ठिकाणी बाप्पा विराजमान झाला आहे. काही जण कोकणातील गावी गणेशोत्सवाला गेले आहेत. तर काहीजण हमखास अष्टविनायकाची यात्रा करुन बाप्पाची भक्ती करतात. मराठमोळे अभिनेते आदेश बांदेकर यांनी अष्टविनायक यात्रेतील रांजणगावच्या बाप्पाच्या यात्रेत घडलेला अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला आहे. वाचून तुम्हीही चकीत व्हाल.

रांजणगावच्या यात्रेत अपघात घडला अन्..

आदेश बांदेकर यांनी मटाला दिलेल्या मुलाखतीत हा खास किस्सा सर्वांसोबत शेअर केला. आदेश बांदेकर म्हणाले, रांजणगावच्या गणपतीची मोठी यात्रा होती. पण या यात्रेत एका कारचा भीषण अपघात झाला. सर्वजण घाबरले कारण त्या कारमध्ये लहान बाळ होतं. त्या गाडीतील बाळ थोडं जखमी झालं परंतु बाप्पाच्या कृपेने सुखरुप होतं. त्या कुटुंबाने ही तर बाप्पाची कृपा असं म्हणत रांजणगावच्या बाप्पाचे मनोमन आभार मानले. लोकांची देवावर किती श्रद्धा असते आणि देव लोकांच्या हाकेला कसा धावून येतो, याचं उदाहरण आदेश बांदेकरांनी सांगितलं.

आदेश बांदेकर यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ते गेली अनेक वर्ष ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत होते. काही महिन्यांपूर्वी या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला. सध्या आदेश बांदेकर स्टार प्रवाहवरीर गणपती विशेष कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत. इतकंच नव्हे काही दिवसांपूर्वी जी आषाढी वारी झाली, त्यासंदर्भातील एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आदेश बांदेकर यांनी केलं.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

6 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

12 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

12 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

13 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

13 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

13 तास ago