महाराष्ट्र

अमेरिकेत थरारक प्रसंग! इंजिन निकामी; पायलटचे ‘शेवटचे शब्द’ रेकॉर्ड

रस्त्यावर इमर्जन्सी लँडिंग करून दोघांचे प्राण वाचले

अमेरिका: अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातील गेन्सविले येथे एका छोट्या विमानाचा अपघात थोडक्यात टळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच विमानाचे इंजिन बंद पडल्याने पायलटने इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. विमान थेट वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावर उतरवण्यात आले आणि सुदैवाने दोन्ही पायलट सुरक्षित बचावले.

सोमवारी (९ फेब्रुवारी) घडलेल्या या घटनेत एक इंजिन असलेल्या विमानाने उड्डाण करताच तांत्रिक बिघाडाचा सामना केला. समोर आलेल्या अहवालानुसार, इंजिन अचानक बंद पडल्याने विमानाला पुन्हा विमानतळावर नेण्यासाठी आवश्यक ऊर्जा उपलब्ध राहिली नाही. त्यामुळे पायलटकडे पर्याय उरला नाही.

पायलट थॉमस रॉजर्स यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत परिस्थितीची माहिती दिली. “गेन्सविलेमधून उड्डाण केल्यानंतर आमचे इंजिन बंद पडले आहे. आम्ही परतण्याचा प्रयत्न करत आहोत,” असा संदेश त्यांनी दिला. मात्र काही क्षणांतच परिस्थिती गंभीर बनली. “आम्ही सर्व प्रयत्न केले, पण विमान विमानतळापर्यंत नेऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही हे विमान रस्त्यावर उतरवत आहोत,” असेही त्यांनी कळवले.

दरम्यान, इमर्जन्सी लँडिंगपूर्वीचा काही मिनिटांचा संवाद अत्यंत भावनिक होता. विमान कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन पायलट रॉजर्स यांनी नियंत्रण कक्षाला शेवटचा संदेश पाठवला. “आम्ही लँडिंग करू शकू असं वाटत नाही. कृपया माझ्या पत्नी मोलीला सांगा की मी तिच्यावर प्रेम करतो. माझ्या आई-वडिलांनाही सांगा, मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो,” असा हृदयस्पर्शी संदेश त्यांनी दिला.

यानंतर विमान रस्त्यावर आदळले. ते दुभाजकाला धडकून काही वाहनांनाही स्पर्शून गेले. मात्र मोठी जीवितहानी टळली. विमानातील दोन्ही पायलट सुखरूप बाहेर पडले. त्यामुळे रॉजर्स यांचे ‘शेवटचे शब्द’ सुदैवाने खरे ठरले नाहीत.या घटनेमुळे विमान सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित यंत्रणांकडून घटनेचा तपास सुरू आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात वेश्या व्यवसायवर पोलिसांचा छापा; परदेशी महिलांसह सात महिलांची सुटका…

शिरूर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथील जयश्री फर्निचरच्या बाजूला असलेल्या लॉजिंगमध्ये सुरू…

1 दिवस ago

शिरूरच्या करडे घाटात गोळीबार, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं…

शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…

2 दिवस ago

सांस्कृतिक कार्य विभागातील संचालकपदाची नियुक्ती रखडली; मंत्रालयात चर्चांना उधाण

मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…

3 दिवस ago

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

3 दिवस ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

3 दिवस ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

4 दिवस ago