महाराष्ट्र

अनाधिकृत विक्रेत्यांना वाहन पुरविणाऱ्या विक्रेत्यांचे ‘ट्रेड प्रमाणपत्र’ रद्द करणार…

मुंबई: राज्यभरातील अनाधिकृत विक्रेत्यांना (मल्टी ब्रँड आउटलेट) विक्रीसाठी वाहन पुरवणाऱ्या अधिकृत वाहन विक्रेत्यांचे ‘ ट्रेड प्रमाणपत्र ‘ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी

परिवहन आयुक्तांना दिले. ते ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सह सचिव (परिवहन) राजेंद्र होळकर, ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनचे अध्यक्ष सचिन महाजन यांच्या सह राज्यभरातील इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मल्टी ब्रँड आउटलेट ‘(MBO) सारख्या अनधिकृत वाहन विक्रेत्यांची राज्यभरात प्रचंड साखळी निर्माण झालेली आहे. राज्य शासनाला कोणत्याही प्रकारचा महसूल न देता हे अनाधिकृत वाहन विक्री करीत असतात. राज्यात इतर विभागातून तसेच परराज्यातून नवीन वाहने आणून ‘ ट्रेड प्रमाणपत्र ‘ नसताना अनाधिकृतरित्या वाहन विक्री करतात . भविष्यात अशा अनाधिकृत विक्रेत्यांना वाहन पुरविणाऱ्या अधिकृत वाहने विक्रेत्यांचे ट्रेड प्रमाणपत्र रद्द करण्यात यावेत. असे निर्देश परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले.

या बैठकीमध्ये ॲटोमोबाईल डीलर्स फेडरेशनच्या विविध मागण्यांच्या वर चर्चा झाली. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की कायद्याच्या कक्षेत राहून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे राहिले.

एसटीच्या बसस्थानकावर ‘ हिरकणी कक्ष ‘ उभारणार

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ॲटोमोबाईल डीलर्स फेडरेशने त्यांच्या CSR फंडातून राज्यभरातील महत्वाच्या एसटी बसस्थानकावर स्तनदा मातांसाठी प्रसाधनगृहाच्या सोयीसह ‘ हिरकणी कक्ष ‘ उभे करावेत, असे आवाहन केले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत ॲटोमोबाईल डीलर्स फेडरेशने पहिल्या टप्प्यात ५१ बसस्थानकावर ‘ हिरकणी कक्ष ‘ उभारुन देण्याची ग्वाही दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

15 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

19 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

19 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

19 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

19 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

19 तास ago