महाराष्ट्र

मराठी भाषा व संस्कृती संपवण्यासाठीच हिंदीची सक्ती, भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हा अजेंडा हाणून पाडू

मुंबई: महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा हट्ट आहे. हिंदी भाषा अथवा कोणत्याच भाषेला विरोध नाही पण मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे असे शिक्षणतज्ञही सांगतात पण भाजपाला मात्र हिंदी भाषेची सक्ती करून मराठी भाषा व संस्कृती संपवायची आहे. भाजपा व रा. स्व. संघाचा हा डाव असून त्याची अंमलबजवाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. या हिंदी सक्तीला काँग्रेसचा विरोध असून कोणत्याही परिस्थितीत राज्यात हिंदीची सक्ती लादू देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

टिळक भवन येथील पत्रकार परिषेदत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, याआधी हिंदी सक्तीचा शासन आदेश आल्यानंतर काँग्रेसने तीव्र आक्षेप नोंदवला होता व हिंदी सक्ती रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सक्ती करणार नाही सरकारने जाहीर केले होते पण आता दि. १७ जून २०२५ रोजी जो शासन आदेश जारी केला आहे त्यात केवळ शब्दछल करून हिंदी सक्ती ठेवली आहे, हा देवेंद्र फडणवीस यांचा कावा सर्वांना समजला आहे. केवळ शब्द बदलल्याने त्याचा आशय बदलत नाही. मराठी ही केवळ भाषा नसून ती आमची संस्कृती आहे, ही संस्कृती संपवण्याचा अजेंडा रा. स्व. संघ व भाजपाचा आहे. हिंदू, हिंदी आणि हिंदूराष्ट्र हे गोवलकरांच्या बंच ऑफ थॉट मध्ये आहे, तोच फडणवीस राबवित आहेत पण हे षडयंत्र हाणून पाडू असे सपकाळ म्हणाले.

भाजपाशासित गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती नाही तर मग महाराष्ट्रातच ती का केली जात आहे. गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती का नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदींना विचारावे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य विरुद्ध भाजपाचा हिंदुराष्ट्र असा हा लढा असून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याबरोबर आहोत. हिंदी सक्तीचा आता कडलोट करावा असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

आता माफिया दाऊद इब्राहिमचाच भाजपा प्रवेश बाकी…

नाशिकचे सुधाकर बडगुजर यांचे संबंध कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता याच्याशी आहेत त्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे देवेंद्र फडणवीस यांनीच विधानसभेत जाहीर केले होते आणि आता त्याच बडगुजरला भाजपाने पायघड्या घालून स्वागत केले. आधी इक्बाल मिर्चीशी संबंधित नेत्याच्या पक्षाला सत्तेत घेऊन मिरची गोड करून घेतली व आता कुत्ताशी सोयरिक केली आहे. आता फक्त दाऊद इब्राहिमलाच भाजपात प्रवेश देणे बाकी आहे, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…

6 तास ago

रोज रात्री पायाला तेलानं मालिश करा, तब्येत कायमची सुधरवून टाकणारा पाहा सोपा उपाय

तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…

6 तास ago

लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही ब्रेन रॉट नावाचा आजार कसा ओळखाल

खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…

6 तास ago

४० कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकरांना दिलासा नाही

दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…

6 तास ago

शिक्षकांच्या प्रश्नांना सरकारचे प्राधान्य; सरनाईक यांच्या विजयासाठी शिंदेंचे आवाहन

अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…

6 तास ago

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे संघर्ष करावा; विजय वडेट्टीवार

अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…

6 तास ago