महाराष्ट्र

धुळे जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या रूपाने कलाक्षेत्रातील भीष्माचार्य हरपला

मुंबई: धुळे जिल्ह्याचे सुपुत्र जगप्रसिद्ध शिल्पकार, महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे नोएडा येथील त्यांच्या निवासस्थानी वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने देशाच्या कलाक्षेत्रात मोठी हानी झाली असून त्याच्या रूपाने कलाक्षेत्रातील भीष्माचार्य हरपला, अशा शब्दांत राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.

राम सुतार यांनी आपल्या प्रतिभासंपन्न, समर्पित आणि प्रामाणिक कलाकर्तृत्वातून ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सह अनेक अजरामर शिल्पकृती निर्माण केल्या. जगातील सर्वोत्तम शिल्पकला साकारण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आयुष्यभर अविश्रांतपणे कला क्षेत्राची सेवा केली. अनेक महापुरुषांच्या शिल्पकृती साकारताना त्यांनी अपार मेहनत, धैर्य आणि अद्वितीय समर्पण दाखवले.

भगवान बुद्ध, भगवान महावीर, स्वामी विवेकानंद यांच्यासह अनेक महान विभूतींच्या मूर्ती त्यांनी अत्यंत जिवंत आणि चित्तवेधक शैलीत साकारल्या. त्यांच्या या अद्वितीय शिल्पकलेमुळे देशासह धुळे जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापार पोहोचले आहे. असे मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

12 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago