महाराष्ट्र

समानतेच्या भूमिकेतून महिलांना मिळाले अधिकार: डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: महिलांबाबतच समाजातील दुजाभाव काम होण्यासाठी समाजाचा चष्मा बदलण्यासंदर्भात आपण सर्वांनी काम करावे. सर्व माणसे समान आहेत याच समानतेच्या भूमिकेतून महिलांना अधिकार मिळाले आहेत. ज्या ठिकाणी स्त्रियांच्या विषमतेचे समर्थन करत असतील तेथे त्याविरोधात आपण जाणिवपुर्वक काम केले पाहिजे, असे आवाहन डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.

ranjangaon-mutadwar-darshan

स्त्री आधार केंद्राच्या वतीने महिला स्वयंसेवक आयकार्ड वाटप कार्यक्रमात उपसभापती नीलम गोऱ्हे बोलत होत्या. पुणे शहर,पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण क्षेत्रातील दक्षता समितीच्या महिलांचे गणेशोत्सव व नवरात्र उत्सव काळात घ्यावयाची काळजी तसेच उपाययोजना बाबत प्रशिक्षण शिबिराचा आयोजन स्त्री आधार केंद्राच्या वतीने मागील आठवड्यात घेण्यात आले होते. यादरम्यान प्रशिक्षणवर आधारित कार्यक्रमातील माहितीच्या आधारे परीक्षा घेऊन उत्तीर्ण स्वयंसेवक महिलांना डॉ.गोऱ्हे, स्त्री आधार केंद्रच्या विश्वस्त जेहलम जोशी, सचिव अपर्णा पाठक यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,अत्याचार होऊ नये म्हणुन आपण काम करणे आवश्यक आहे. ना की फक्त अत्याचार झाल्यास संस्थेसोबत काम करणे. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच यावेळी विश्वस्त जेहलम जोशी यांनी महिलांना वाटप करण्यात आलेल्या आयकार्डचा दुरूपयोग होणार नाही. याबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले.

यावेळी सचिव अपर्णा पाठक म्हणाल्या की,मागील वर्षी स्त्री आधार केंद्राच्या मार्फत महिला स्वयंसेवक यांनी केलेली कामगिरी सांगितली. दर महिन्याच्या 25 तारखेला महिलांच्यावर होणारे अत्याचार विरोधी कार्यक्रम संस्थेत राबविला जातो. याबाबत उपस्थित महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी संस्थेचे कार्यकर्ते रमेश शेलार यांनी प्रास्ताविक केले. तर सूत्रसंचालन अनिता शिंदे यांनी केले. यासाठी आश्लेष खंडागळे आणि विभावरी कांबळे यांनी विशेष प्रयत्न केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

21 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago