महाराष्ट्र

नागपुरात समुपदेशनाच्या नावाखाली डॉक्टरकडून महिलांवर अत्याचार

कठोर कारवाई करण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

नागपूर: नागपूर शहर हद्दीमध्ये हुडकेश्वर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील समुपदेशक डॉक्टरने मागील नऊ-दहा वर्ष करिअर कौन्सिलिंग व इतर समुपदेशनाच्या नावाखाली अकरावी-बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ४ जानेवारी २०२५ रोजी एका महिलेने तक्रार दाखल केल्याने सदर घटना उघडकीस आली असून अकरावी बारावीच्या त्यावेळी अज्ञान असलेल्या मुलींच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर अत्याचार व ब्लॅकमेलिंग केल्याचे समजते. या प्रकरणाची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश नागपूर शहर पोलीस आयुक्त यांना दिले आहेत.

पोलिसांनी या एका तक्रारीच्या आधारे अजून तीन फिर्यादीं चा शोध घेऊन एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. स्वयंप्रेरणेने केलेली ही कार्यवाही दखलपात्र व मानवी अधिकाराबाबत सजगता दाखवून देणारी आहे, असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या. त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागपूर पोलीस आयुक्तांना काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

संबंधित प्रकरणातील सर्व आरोपी यांना कठोर शिक्षा होण्याच्या अनुषंगाने सदर प्रकरणाची सखोल चौकशी तात्काळ करण्यात यावी. मागील नऊ-दहा वर्षापासून आरोपीकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत असल्याने याबाबत सबळ पुरावे संकलित करण्यात यावेत व सत्वर चार्जशीट दाखल करण्याची दक्षता घ्यावी.

साक्षीदार सुरक्षा कायद्यांतर्गत संबंधित पीडित महिला साक्षीदार यांना योग्य संरक्षण पुरवण्याची कार्यवाही करावी. त्यांच्या नावांबाबत गोपनीयता राखण्यात यावी. हे प्रकरण जलद गती न्यायालयासमोर चालवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. त्याचबरोबर आरोपीस कठोर शिक्षा होण्याच्या अनुषंगाने अनुभवी व निष्णात  सरकारी वकील नियुक्त करण्यात यावेत. समुपदेशनातून देखील अत्याचार होत असल्याने आता महिला समुपदेशक नियुक्त करून त्यांच्यामार्फतच संबंधित महिलांना योग्य समुपदेशन मिळावे यासाठीची तरतूद करावी.

तसेच नियमितपणे समुपदेशन घेणाऱ्या व्यक्तींकडून निरपेक्ष व स्वतंत्र यंत्रणांकडून समुपदेशन प्रक्रियांचे मूल्यमापन करण्यात यावे. मुलींचे स्वमदत गट करून मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम विश्वासार्ह महिला संस्थांतर्फे करून घेण्यात यावे. त्याचबरोबर या प्रकरणी शासकीय पंचांची नियुक्ती करून तपासामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घेणेबाबत उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आयुक्तांना निर्देश दिले आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

16 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago