shirur-taluka-logo

माहेर संस्थेकडून ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ रॅलीचे आयोजन

शिरूर तालुका

शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील अनाथांसाठी कार्य करणाऱ्या माहेर संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने नुकतेच तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरियन, अध्यक्षा हिराबेगम मुल्ला यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या तिरंगा रॅलीमध्ये सर्व बालकांसह, संस्थेचे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी सर्वांनी हातामध्ये तिरंगा ध्वज घेत भारत माता की जय, स्वातंत्र्य दिनाचा विजय असो यांसह अनेक घोषणा दिल्या. आयोजित करण्यात आलेली रॅली वढू बुद्रुक गावातून घोषणा देत धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळी आल्यानंतर छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत रॅलीची सांगता करण्यात आली.