एका कंपनीच्या परिसरात नागानेच गिळला चक्क विषारी घोणस साप

शिक्रापूर: वन्य प्राण्यांमध्ये नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमधून सर्वात विषारी समजला जाणारा साप आहे. मात्र महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळून येणारा घोणस साप नागापेक्षा जास्त विषारी असून या विषारी घोणस सापाला चक्क एका नागाने गिळल्याचा प्रकार पुणे नगर महामार्गा लगतच्या एका कंपनीच्या परिसरात समोर आला आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एका कंपनीच्या परिसरात दोन साप निघाले असल्याची माहिती येथील नागरिकांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड सर्पमित्र शेरखान शेख यांना दिली, त्यांनतर सर्पमित्र शेरखान शेख, अमोल कुसाळकर, श्रेयस मांढरे, शुभम माने यांनी सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता तेथे पाच फुट लांबीचा भला मोठा नाग व त्या नागाने चक्क दोन ते अडीच फुट लांबीच्या विषारी घोणस जातीच्या सापाला गिळल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्पमित्र देखील आश्चर्य चकित झाले. त्यांनी याबाबतची माहिती वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे शिरुर तालुकाध्यक्ष श्रीकांत भाडळे व सर्प अभ्यासक अमर गोडांबे यांना दिली असता या दोन्ही सापांचे खाद्य उंदीर व बेडूक आहेत.

मात्र अन्नाच्या शोधात नागाने घोणस सापाला गिळले असल्याचा अंदाज भाडळे व गोडांबे यांनी वर्तविला तर सर्पमित्रांनी येथील नागाला पकडताच त्याने गिळलेला घोणस साप पूर्णपणे बाहेर काढून टाकला मात्र घोणस सापाला यामध्ये जीव गमवावा लागला. दरम्यान पकडलेल्या नागाला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवून मोदींना हटवण्याचे स्वप्न पाहू नका! विरोधकांना एकनाथ शिंदेंचा ठाण्यातून घणाघात

‘लोकतंत्र बचाव’च्या नावाखाली काँग्रेसकडून लोकशाहीबाबत संभ्रम; व्होट चोरीच्या आरोपांवर पुरावे देण्याचे शिंदेंचे आव्हान ठाणे :…

5 तास ago

दुष्काळात बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही; आज मदतीचा हात, उद्या शेताला पाणी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नांदेडच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही; १०० बेडचे रुग्णालय २०० बेडचे करण्याचे निर्देश, शेतकऱ्यांना…

5 तास ago

संघर्षातून सत्तेच्या शिखरापर्यंत! जनतेच्या विश्वासातून घडलेले नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे

रिक्षाचालक ते उपमुख्यमंत्री; संघर्ष, संघटनकौशल्य, लोकसंपर्क आणि विकासाभिमुख वाटचालीचा प्रेरणादायी प्रवास मुंबई: नेतृत्व हे केवळ…

5 तास ago

डिंग्रजवाडीतून ५ लाखांचे सर्व्हे मशिन चोरीला; शिक्रापूर पोलिसांची हरियाणापर्यंत धडक!

एक आरोपी हरियाणातून, तर दुसरा विश्रांतवाडीतून जेरबंद; ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर…

8 तास ago

मेंदुत रक्ताची गाठ तयार झाल्याचं कसं ओळखाल जाणून घ्या काय दिसतात लक्षण

सामान्यपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला जखम झाली किंवा कुठं खरचटलं तर रक्त निघतं. हे रक्त निघणं…

1 दिवस ago

कडूलिंबातील औषधी गुण

कडूलिंबाचा प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत आहे. हे एक असं झाड आहे, जे…

1 दिवस ago