शिरूर तालुका

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त वन विभागाकडून जनजागृती…

शिरुर: टाकळी हाजी (ता. शिरुर) येथे वन विभाग शिरुर कार्यालयामार्फत ग्रामस्थांना एकत्र करुन बिबट्या पासून संरक्षण आणि बिबट्याचे संवर्धन या विषयावर शिरुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सविता चव्हाण, विठ्ठल भुजबळ, आनंदा शेवाळे, अभिजित सातपुते या टीम कडून जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे.

वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, कोल्हा, हत्ती, रान कुत्रे यांच्या हल्ल्यात मनुष्य हानी झाल्यास किंवा व्यक्ती मृत झाल्यास १५ लाख रुपये, गाय बैल म्हैस ६० हजार रुपये, व्यक्ती कायम अपंग झाल्यास ५ लाख रुपये, व्यक्ती गंभीर जखमी झाल्यास १ लाख २५ हजार रुपये, व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास २० हजार रुपये शासनाच्या वतीने लाभ मिळणार असल्याचे वनरक्षक सविता चव्हाण यांनी सांगितले. तसेच बिबट्या पासून संरक्षण कसे करावे याबद्दल माहिती देण्यात आली.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्या अरुणाताई घोडे, माजी ग्रामपंचायत सदस्या वंदनाताई खामकर, पोलीस पाटील शोभाताई मंदिलकर, सखाराम खोमणे, शंकर घोडे, तबाजी मंदिलकर, कुंडलिक जाधव, रोहिदास घोडे, योगेश हिलाळ, पोपट घोडे, भाऊसाहेब टेमकर,दादाभाऊ घोडे,नितीन थोरात, सनी गावडे, स्वप्नील चोरे, बाबू चोरे, बाळासाहेब खटाटे, माऊली रसाळ, पत्रकार प्रवीण गायकवाड, साहेबराव लोखंडे, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आधी तरुणांची माफी मागा, मग संवाद साधा; मोहन भागवतांवर काँग्रेसचा निशाणा

मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय…

3 तास ago

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विराट जनआक्रोश मोर्चा; भाजप सरकारवर घणाघाती हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन…

3 तास ago

व्यायाम व योगा करण्याचे फायदे

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे…

6 तास ago

चयापचय बिघडण्याची कारणे

झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे…

6 तास ago

छत्रपती संभाजीनगरच्या विकास प्रकल्पांना गती; भूसंपादनासाठी ३० खासगी भूमापकांची नियुक्ती

ऑरिक, ग्रीनफील्ड रस्ता, विमानतळ विस्तार आणि रेल्वे दुहेरीकरणाच्या कामांना मिळणार वेग; नागरिकांच्या जमीन मोजणीची प्रतीक्षाही…

6 तास ago

‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा आक्रमक; मुंबईत काँग्रेसविरोधात मूक आंदोलन.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर…

7 तास ago