शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील एका महाविद्यालयीन युवतीचा घरात घुसून विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नारायण बिचुकले या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
करंदी (ता. शिरुर) येथील महाविद्यालयीन युवती घरात अभ्यास करत असताना गावातील नारायण बिचुकले हा व्यक्ती दारुच्या नशेत युवतीच्या घराजवळ आला त्याने घरात जाऊन युवती अभ्यास करत असताना तिचा हात पकडत तिच्या मनाला उत्पन्न होईल असे कृत्य केले.
दरम्यान युवती आरडाओरडा करू लागली असताना बिचुकले याने युवतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी युवतीच्या आवाजाने शेजारील काही नागरिक धावून आले असता नारायण बिचुकले हा तेथून पळून गेला घडलेल्या प्रकाराबाबत युवतीने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी नारायण बिचुकले रा. करंदी (ता. शिरुर) जि. पुणे या इसमावर विनयभंग प्रकरणी गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार ज्योती आहेरकर या करत आहे.
पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…
तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…
खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…
दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…
अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…
अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…