शिरूर तालुका

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाची सहविचार सभा संपन्न

शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाची सहविचार सभा नुकतीच शिक्षक संघाच्या विविध पदाधिकारी व शिक्षकांची बैठक नुकतीच संपन्न झाली असून यावेळी शिक्षकांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा करत त्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचा ठरवण्यात आले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाची सहविचार सभा फेडरेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नवमहाराष्ट्र विद्यालय पिंपरी पुणे येथे संपन्न झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शरदचंद्र धारुरकर, सोलापूर जिल्हा समन्वयक सचिन झाडबुके, प्राचार्य एस. पी. दोरगे, शिक्षक नेते गणपतराव तावरे, पुणे जिल्हा समन्वयक दादासाहेब गवारे, सचिव एस. डी. भिरुड, राजेंद्र लांडे, आप्पासाहेब शिंदे, संजय पवार यांसह आदी शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करत सभेची सुरुवात करण्यात आली.

तसेच यावेळी शिक्षकांना संरक्षण द्यावे, सहावी ते आठवीच्या शिक्षकांना बी. एड. वेतन श्रेणी द्यावी, आहर्ता प्राप्त शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी त्वरीत लागू करावी, सर्वच शिक्षकांना जुनी पेन्शन योजणा लागू करावी, त्रुटींची पुर्तता करणाऱ्या शाळांना ताबडतोब अनुदान मिळावे, शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करणे, विविध थकित बिले ताबडतोब मिळवित, विविध प्रलंबित प्रस्तावांना मान्यता मिळावी, शिक्षकेत्तरांची पदोन्नती व भरती लवकरच सुरु करण्यात यावी, विविध कार्यालयातील भ्रष्टाचाराला आळा बसावा यासह विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचे ठरवण्यात आले. दरम्यान सभेला अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पुणे जिल्हा समन्वयक दादासाहेब गवारे यांनी सर्वांचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कवठे येमाई आरोग्य केंद्रात ‘डॉक्टर दाखवा बक्षीस मिळवा’ वैतागलेल्या ग्रामस्थांनी ठोकले आरोग्य केंद्राला टाळे

शिरुर (अरुणकुमार मोटे) कवठे येमाई (ता.शिरुर) येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नियमितपणे उपलब्ध राहत नसल्याने…

5 तास ago

करंदी गावातील कार्यकर्त्यांना नोटीसा; शिवाजीराव आढळराव यांच्या आडुन नक्की वार करतंय कोण…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदारसंघात सध्या लोकसभा प्रचार शिगेला पोहचला असुन कार्यकर्त्यांनी आपल्या सभेत…

6 तास ago

शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथे किराणा दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी तब्बल 26 लाखाचे नुकसान

शिरुर (अरुणकुमार मोटे) टाकळी हाजी (ता.शिरुर) येथे सागर किराणा स्टोअर्स या दुकानाला आज गुरुवार (दि.२)…

1 दिवस ago

Video; न्हावरे येथील घोडगंगा कारखान्याच्या भंगाराला आग; अग्निशमन दलाच्या जवानांमुळे वेळीच आग आटोक्यात

शिंदोडी (तेजस फडके) न्हावरे (ता. शिरुर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या आवारातील भंगारात…

1 दिवस ago

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक कामगार दिन साजरा

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आज महाराष्ट्रदिन तसेच कामगारदिनाचे औचित्य साधुन रामलिंग येथील ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या कामगार…

2 दिवस ago

शिरुर; महसुल यंत्रणा निवडणुकीत व्यस्त असल्याने माजी सरपंचाचा नातेवाईकच करतोय घोड धरणातुन वाळूचोरी

शिंदोडी (तेजस फडके) सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालु असुन शिरुर तहसीलदार कार्यालयातील महसूलचे…

3 दिवस ago