शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील इनामगाव (नलगे मळा रोड, कौल वस्ती) येथे आज पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. लक्ष्मीबाई बबन भोईटे (वय ८२) या वृद्ध महिलेला घराच्या पढवीत झोपलेले असताना बिबट्याने शिकार समजून फरफटत नेले आणि हल्ला करून ठार केले.
ही घटना पहाटे साडेचारच्या दरम्यान घडली. सुरुवातीला घरासमोर असलेल्या कुत्र्यावर बिबट्याने झडप घातली. कुत्रा घाबरून पळून गेल्यावर बिबट्याचे लक्ष वृद्ध महिलेकडे गेले. त्याने त्यांना घराच्या मागील डांबरी रस्त्यापलीकडील अंदाजे ७०० फूट अंतरावरील उसाच्या शेतात ओढून नेले. सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास ही माहिती ग्रामस्थ विक्रमसिंग बाळासो नलगे यांनी वनविभागाला दिल्यानंतर शिरूरचे वनपाल व पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
वनविभागाच्या पथकाने पंचनामा करून ते ग्रामीण रुग्णालय, न्हावरे येथे शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेनंतर सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी स्मिता राजहंस, वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी घटनास्थळी भेट देत ग्रामस्थ व सरपंच-उपसरपंचांसमवेत चर्चा केली.
हल्ला करणाऱ्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने ड्रोन, ९ ट्रॅप कॅमेरे, ५ पिंजरे, ४ अनायडर आणि २ फिरते कॅमेरे बसवले आहेत. परिसरात रात्रीची गस्त वाढवण्यात आली असून, बिबट प्रवण क्षेत्रांत जनजागृती मोहिमही सुरू केली आहे.
वनविभागाने महत्त्वाच्या सूचना
रात्री उघड्यावर झोपणे व शौचास जाणे टाळावे.
घराभोवती प्रकाश व्यवस्था उत्तम ठेवावी.
संध्याकाळी आणि पहाटे शक्यतो घराबाहेर पडू नये.
रात्री घराबाहेर बाहेर पडताना टॉर्च व काठी बाळगणे आवश्यक
लहान मुलांना रात्री एकटे सोडू नये.
घराजवळील झाडोरा व गवत स्वच्छ करावे.
बिबट्याचे दर्शन झाल्यास आरडाओरडा करून इतरांना सावध करावे.
कोल्हापूर: घरगुती वादातून रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या ३२ वर्षीय तरुणाने बहिणीच्या डोळ्यांसमोर रुई येथील पंचगंगा…
परभणी: मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि इतर सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक…
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ॲड. अमोल मातेले यांचा सरकारला इशारा; ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ म्हणत जोरदार…
पवारांसोबत राहिलो असतो तर नुकसान झाले असते; खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात जुन्या राजकीय आठवणींना उजाळा…
सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून…
निलंगा : भावाची प्रकृती खालावल्याचे समजताच त्याची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या धाकट्या भावाची ती भेटच दोघांची…