शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत पशुधन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शिरुर पोलिसांच्या डी.बी. पथकाला यश आले आहे. पशुधन चोरीच्या दोन गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, चोरी गेलेल्या दोन म्हशी, दोन बैल आणि एक पिकअप वाहन असा एकूण ५ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शिरुर परिसरात पशुधन चोरी करणाऱ्या टोळीला मोठा दणका बसला आहे.
दि ११ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी चार ते १२ ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान सरदवाडी (ता. शिरुर) येथील न्हावरा फाटा ते चौफुला रस्त्यालगत दादाभाऊ मगर यांच्या शेतजमिनीतील खुल्या जागेत पाल टाकून राहत असलेल्या ठिकाणी बांधलेल्या दोन म्हशी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या होत्या. या म्हशींची किंमत सुमारे ८० हजार रुपये होती. याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.❤️
पशुधन चोरीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी तातडीने चोरीस गेलेल्या म्हशी आणि अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शोध (DB) पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरु केला.
या तपासा दरम्यान पोलीस अंमलदार नितेश थोरात यांना संशयित आरोपी रामनाथ सलिम भोसले (वय ३१, रा. पाण्याची टाकी, शिरुर) हा शिरुर बाजारपेठ परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व DB पथकाने शिरुर बाजारपेठ परिसरात सापळा रचून रामनाथ भोसले याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत रामनाथ भोसले याने साथीदाराच्या मदतीने सदर पशुधन चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलीस कोठडीत अधिक तपास केला असता त्याने शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत आणखी एका ठिकाणी पशुधन चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पशुधन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये शिरुर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यांचा यांचा समावेश आहे.
सदर तपासात रामनाथ भोसले याने दोन्ही गुन्ह्यांमध्ये चोरी केलेल्या दोन म्हशी व दोन बैल आरोपी जावेद बबन पठाण (वय ३७, रा. वाळकी, ता. जि. अहिल्यानगर) याला विकल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर जावेद पठाण यालाही गुन्ह्याच्या तपासासाठी अटक करण्यात आली.
शिरुर पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून दोन म्हशी, दोन बैल आणि एक पिकअप वाहन असा एकूण ५ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ३ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार अक्षय कळमकर करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार अक्षय कळमकर, पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, राहुल वाघमोडे, अंबादास थोरे, निरज पिसाळ, निखील रावडे, सचिन भोई, अजय पाटील आणि दादाराव नागरे यांच्या पथकाने सहभाग घेतला.
पशुधन चोरीच्या दोन गुन्ह्यांचा छडा लावून चोरीचा मुद्देमाल परत मिळविण्यात आल्याने पशुपालकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांची गस्त आणि तपास अधिक प्रभावी करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
शिरुर (तेजस फडके): वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करणे हि प्रत्येक चालकाची जबाबदारी असते. मात्र…
पूर्वीच्या काळी लोक अशी कामं करत असत ज्यात शरीराला जास्त मेहनत करावी लागत असे. पण…
घसा खराब होणे, सोलवटल्यासारखे वाटणे आणि खाताना त्रास होणे हे अनेकदा बदलत्या हवामानामुळे, गरम-थंड पदार्थ…
आहार: सकाळचा नाश्ता: फळे, भाज्या, कडधान्ये आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. मीठाचे…
मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) धडाकेबाज कारवाईमुळे राज्यातील भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या…
पुणे : गणेशोत्सवातील डीजे आणि वाढत्या ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्याधर बापट यांना टीव्ही9…