शिरूर तालुका

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा ६३ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

विद्यार्थ्यांना जीवनोपयोगी साहित्य वाटप; शिक्षक व शिक्षणाच्या प्रश्नांवर ठाम भूमिका

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा ६३ वा वर्धापन दिन शिरूर तालुक्यात उत्साहात व सामाजिक जाणीवेने साजरा करण्यात आला. या निमित्ताने शिरूर शिक्षक समितीच्या वतीने गुरुकुल अनाथ आश्रम, कासारी फाटा (संचालक शिवाजी शिंदे) येथील अनाथ मुलांना किराणा, धान्य व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून ‘शिक्षक समिती’ने आपल्या सामाजिक बांधिलकीचा ठसा पुन्हा एकदा अधोरेखित केला. याप्रसंगी उपस्थित शिक्षक व पदाधिकाऱ्यांनी ‘शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण’ यासंबंधीच्या प्रश्नांवर मार्गदर्शक विचार मांडले.

कार्यक्रमात बोलताना राज्य संघटक शहाजी पवार यांनी सांगितले की,“कै. भा.वा. शिंपी गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या शिक्षक समितीचा उद्देश विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला केंद्रस्थानी ठेवून शिक्षक व शिक्षणाशी संबंधित समस्या सोडवण्याचा आहे. ‘न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड’ हे ब्रीद घेऊन काम करणारी शिक्षक समिती ही एक सक्षम, शिस्तबद्ध, मान्यताप्राप्त आणि विश्वासार्ह संघटना आहे. अन्याय झाला, की संघटना तत्काळ धाव घेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष शरद धोत्रे होते. यावेळी जिल्हा नेते शरद निंबाळकर, संचालक अविनाश चव्हाण, सतीश नागवडे, कैलास पडवळ यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले.

या सामाजिक उपक्रमात सखाराम फराटे, विष्णू चौधर, मारुती निकम, संपत कांदळकर, नामदेव गायकवाड, रमेश देशमुख, लहू चव्हाण, विश्वास साकोरे, खंडू माशेरे, अनिल जगदाळे, विकास गायकवाड, अजित रणसिंग, दादासाहेब कुदळे, रेखाताई लंघे, मालन गायकवाड, राजश्री मोटे, दिपाली पडवळ, नीता वाबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी तालुका नेते सुरेश शिवले यांनी उपस्थितांचे आभार मानले. शाळा, विद्यार्थी आणि समाज यांच्यातील बंध अधिक मजबूत व्हावेत या हेतूने शिक्षक समितीच्या वतीने राबवला गेलेला हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

6 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

7 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

7 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

7 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

7 तास ago

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

12 तास ago