शिरूर तालुका

संकष्टी चतुर्थी निमित्त श्री महागणपतीच्या मंदिरात सामुहिक अथर्वशीर्ष पठण

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): सोमवार (दि 8) रोजी संकष्टी चतुर्थी निमित्त रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिर पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. तसेच संकष्टी चतुर्थी निमित्त श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये अनेक भाविकांनी अथर्वशीर्ष पठण केले. तसेच यापुढे प्रत्येक संकष्टी चतुर्थीला सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम सुरू राहणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील यांनी दिली.

रांजणगाव गणपती हे अष्टविनायकामधील आठवे स्थान असुन या महागणपतीचा लौकिक सर्व महाराष्ट्रात नवसाला पावणारा गणपती म्हणुन आहे. संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांसाठी उत्तम जलद दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याचे पाणी, उन्हाच्या तीव्र झळा लागत असल्याने मंदीर परिसरात भाविकांसाठी मंडप करण्यात आला होता. तसेच श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट व अष्टविनायक ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

संकष्टी चतुर्थी निमित्त दुपारी १२ वाजता मुख्यविश्वस्त ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. तसेच प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. तसेच श्री महागणपती भजनी मंडळ, रांजणगाव गणपती यांचा भजनाचा कार्यक्रम झाला.

यावेळी देवस्थानचे विश्वस्त मंडळ मुख्य विश्वस्त ओमकार देव, अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष संदिप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर पाटील, खजिनदार विजय देव तसेच पुजारी प्रसाद कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी, राजमुद्रा पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाचुंदकर पाटील व देवस्थान कर्मचारी, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

12 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

12 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

12 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

1 दिवस ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

1 दिवस ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

1 दिवस ago