शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंदिरा कॉलनी मध्ये जमिनीतील जुन्या टाकीत पडलेल्या कुत्र्याच्या 2 पिल्लांना सुखरुप बाहेर काढून जीवदान देण्यात शिक्रापूर येथील प्राणीमित्रांना यश आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील तुषार आळंदीकर हे सकाळच्या सुमारास घराच्या बाजूला गाय बांधण्यासाठी गेले असता त्यांना कुत्र्याच्या पिलांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी आजूबाजूला झाडीमध्ये शोध घेतला असता जमिनीतील 7 ते 8 फुट खोल टाकीत कुत्र्याची पिल्ले पडल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती मिळताच सर्पमित्र शेरखान शेख, अमोल कुसाळकर, डॉ. नितीन सोनवणे यांनी सदर ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता तेथील जुन्या टाकीमध्ये कुत्र्याची 3 पिल्ले मृत तर 2 पिल्ले जिवंत असल्याचे दिसून आले.
दरम्यान प्राणीमित्रांनी त्या कुत्र्याच्या पिल्लांना सुखरुप बाहेर काढले, तर डॉ. नितीन सोनवणे यांनी त्या पिल्लांवर उपचार केले असून तुषार आळंदीकर यांनी त्या पिल्लांना संगोपनासाठी ठेवून घेतले आहे, तर प्राणी मित्रांच्या कार्याचे परिसरातील नागरिक कौतुक करत आहे.
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…