शिरूर तालुका

शिरूर शहर व पंचक्रोशी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिरूर मध्ये ऐतिहासिक शिवशाही मिरवणूक

शिरूर (अरुणकुमार मोटे): वाघनखे नाटक, व्याख्यान, महाराष्ट्राचा शाहिरी कार्यक्रम, आणि भव्य शिवशाही मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी, भगव्या झेंड्याची हवेत फिरली शान, डीजेचा दणका आणि शिरूर शहर झालं शिवमय शिवशाही मिरवणुकीने शिरूरकराची मने जिंकत जय भवानी जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय या गगनभेदी घोषणे संपूर्ण शिरूर शहर दणाणून गेले होते.

शिरूर शहर व पंचक्रोशी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिरूर शहरात गेल्या अनेक वर्षापासून शिवजयंती साजरी करण्यात येते. आजही तेवढ्यात उत्साह शिवजयंती साजरी करण्यात आली. परंतु सध्या शिवजयंती चा इतिहास आणि वाढती शिवजयंती आणि नागरिकांचे मन जिंकणाऱ्या मिरवणुकी प्रत्येक वर्षी नवीन आकर्षण ठरत आहे.

शिरूर शहर व पंचक्रोशी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने यंदाच्या वर्षी १६ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध व्याख्याते विठ्ठल खांडगे सर यांचे आजचा युवा उद्याचे भविष्य या विषयावरील व्याख्यान शिरूरकरांची मने जिंकून गेले. तर १७ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्वलंत इतिहास सांगणारे वाघ नखे हे २५ कलाकारांनी सादर केलेले नाटक प्रत्येक शिरूरकरांच्या मनात घर करून गेले. तर 18 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचा शाहीरी बाणा हे प्रसिद्ध युवाशाहीर चंद्रकांत माने व युवा शाहीर ऋतुजा माने यांनी शिरूरकरांची वाहवा मिळवत जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा देत उत्साह वाढवला.यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक चंद्रशेखर गोजंमगुंडे उपस्थित होते.

शिरूर बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार घालून या छत्रपती शिवाजी महाराज जयंती ची शिवशाही मिरवणुकीत सुरुवात झाली. लहानांपासून मोठ्या पर्यंत प्रत्येकाने एकच ठेका आणि अनेकांच्या हातात भगवे ध्वज नाचत संपूर्ण शिरूर शहरातून ही मिरवणूक निघाली शहरातील व पंचक्रोशीतील महिला पुरुष लहान बाळांपासून सर्वांनीच या शिवजयंतीचा आनंद घेतला. तर अनेक पालक आपली लहानगी मुलं घेऊन शिवजयंती मिरवणुकीमध्ये मुलांना शिवरायांचा इतिहास शिकवताना व जय भवानी जय शिवराय घोषणा देताना दिसत होते.

शिरूर शहर व पंचक्रोशी शिवजयंती समितीच्या कुणाल काळे, अक्षय ढमढेरे, सुनील इंदुलकर, सागर परभणे, भूषण थोरात, भूषण खैरे, योगेश फाळके, विकास सांबारे, पराग खराडे, ऋषिकेश गुजर, मोहीत माने, रामराज गवारे, योगेश जामदार, हेमंत नेपाळी, अजिक्य महाजन, भूषण रणदिवे या प्रत्येक कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून शिवजयंती यशस्वी पार पाडली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

3 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

11 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

11 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

11 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

11 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

12 तास ago