शिरूर तालुका

सणसवाडीत ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; बॅरलमध्ये पाणी भरून कंपनीची दिशाभूल, दोन सराईत चोरटे अटकेत

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेल चोरी करून पुरावे नष्ट करण्यासाठी रिकाम्या बॅरलमध्ये पाणी भरून ठेवणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे सुमारे ७२ हजार रुपयांच्या डिझेल चोरीचा यशस्वी छडा लागला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत कंपनीच्या जनरेटरजवळील बॅरलमधून ८०० लिटर डिझेल चोरीला गेले होते. चोरीचा संशय येऊ नये म्हणून आरोपींनी रिकाम्या बॅरलमध्ये पाणी भरून कंपनीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी अक्षय प्रेमचंद देवडे (रा. शिक्रापूर) आणि अविनाश शंकर धुमाळ (रा. रांजणगाव) यांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनीही डिझेल चोरीची कबुली दिली.

तपासात अक्षय देवडे याच्यावर यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे, तर अविनाश धुमाळ याच्यावर दरोड्यासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे. चोरीस गेलेले डिझेल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असून या दोघांकडून आणखी अशाच प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर तसेच त्यांच्या पथकाने केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

12 मिनिटे ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

17 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

21 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

21 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

21 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

21 तास ago