हरित महाराष्ट्रासाठी ७० झाडांचे दत्तक रोपण
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशन पुणे (ग्रामीण) यांच्या वतीने “हरित महाराष्ट्र” संकल्पनेला चालना देण्यासाठी ‘एक पाऊल पुढे’ या विशेष मोहिमेअंतर्गत आज शिरूर बसस्थानकजवळील नवीन पोलीस स्टेशनच्या आवारात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सदर उपक्रमासाठी ‘श्रीविश्वक फाउंडेशन’ यांच्यातर्फे एकूण ७० झाडे उपलब्ध करून देण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिरूर शहरातील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. स्वप्निल भालेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमास शिरूर शहर व परिसरातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक तसेच महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
या वेळी शिरूर पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी “माझं झाड, माझं कर्तव्य” या घोषवाक्याखाली सहभागी झाले. प्रत्येकाने एक झाड स्वतःहून लावले आणि झाड दत्तक घेण्याची जबाबदारी अंगीकारली. एकूण ७० झाडे ही पोलीस कर्मचाऱ्यांना दत्तक देण्यात आली असून, त्या झाडांची निगा राखण्याची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. हाउपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित न ठेवता निसर्ग संरक्षण, पर्यावरण संतुलन आणि हरित शिरूर या दिशेने एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे.
शिरूर पोलीस स्टेशनने घेतलेली ही पुढाकारशील भूमिका समाजात पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणारी ठरत असून, इतर संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरावी, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…