इतर

पावसाळा व सापांचे प्रजनन सुरु झाल्याने सर्पदंशात वाढ

सापांच्या चार जाती विषारी, इतर सर्व जाती पूर्णपणे बिनविषारी

शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असून सापांचा प्रजनन काळ सुरु आहे. सापांच्या बिळामध्ये पाणी जात असल्याने अनेक ठिकाणी साप आढळून येत असताना कित्येक ठिकाणी घोणस व नाग या विषारी सापांची पिल्ले आढळून येत आहेत. मात्र सर्वच साप विषारी नसल्याने नागरिकांनी घाबरुन न जाता सर्पमित्रांना माहिती दिल्यास साप देखील वाचू शकतो तसेच नागरिकांचा धोका देखील टळू शकतो.

साप हे खरे तर शेतकऱ्यांचे मित्र असतात. मात्र साप निदर्शनास येताच नागरिकांची बोबडी वळते. परंतु शेतात पिकांचे नुकसान करणारे उंदीर साप फस्त करत असल्यामुळे शेतातील पिकांचे एक प्रकारे रक्षण होत असते. त्यामुळे काही शेतकरी शेतात साप आढळून आल्यास त्याला मारत देखील नाहीत, तर समाधान व्यक्त करतात. सध्या ग्रामीण भागामध्ये सापांचे प्रमाण वाढलेले सर्पदंशाच्या घटना देखील तितक्याच वेगाने वाढल्या आहेत. परंतु सर्व साप विषारी नसून फक्त फुरसे, घोणस, नाग, मण्यार हे साप विषारी आहेत. तसेच सध्या विषारी जातीतील पोवळा हा साप आपल्या भागात आढळून येऊ लागला आहे. यांच्या व्यतिरिक्त आढळून येणारे सर्वच साप हे पूर्णपणे बिनविषारी आहेत.

unique international school

आपल्या भागात आढळणारे घोणस व अजगर तसेच मण्यार व कवड्या हे साप एकसारखेच दिसत असल्याने अनेकदा नागरिक विषारी मण्यार सापाला कवड्या समजून तर विषारी घोणस सापाला अजगर म्हणून पकडण्याचा प्रयत्न करतात. परंतु पुरेशी माहिती नसल्याने सर्पदंशाचा धोका नागरिक ओढून घेतात. पावसाळयामध्ये अनेक ठिकाणी शेतातील कामे करताना तसेच घराजवळील अडगळीच्या ठिकाणी साप बसलेले असतात परंतु नागरिक पुरेशी खबरदारी न घेता सदर ठिकाणी कामे करतात त्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता उद्भवते, सध्या सर्वत्र सर्पमित्र उपलब्ध असल्याने नागरिकांनी सापांबाबत गैरसमज न ठेवता आपल्या निसर्गाच्या रक्षणासाठी पुणे येथे काळाची गरज बनलेली आहे.

सर्व साप हे विषारी नसतात त्यामुळे एखाद्या नागरिकाला चावलेला प्रत्येक साप विषारी असेलच असे नाही, एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झाल्यास त्याला धीर देत जवळील रुग्णालयात घेऊन जावे, सर्पदंशावर प्रभावी औषधे उपलब्ध असल्याने वेळीच उपचार मिळाल्यास नागरिकांचा जीव वाचू शकतो असे वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे शिरुर तालुकाध्यक्ष श्रीकांत भाडळे व सचिव शेरखान शेख यांनी सांगितले.

विषारी सापांची थोडक्यात माहिती…
फुरसे- फुरसे साप घनदाट जंगलात आढळत असून त्याची लांबी दोन ते अडीच फुट वाढते तर हा साप लहान व पातळ तसेच विषारी आहे.
घोणस- घोणस साप अत्यंत विषारी असून हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो. ग्रामीण भागातील नागरिक त्याला परड म्हणून ओळखतात तर काही नागरिक त्याला अजगर म्हणतात हा साप कुकरच्या शिट्टीसारखा आवाज काढतो.
नाग- नाग फणा काढत असल्याने नाग सहजपणे ओळखून येतो, हा विषारी असून चावण्यापूर्वी फणा काढून फुस्कारतो हा देखील विषारी साप आहे.
मण्यार- मण्यार साप भारतातील सर्वात विषारी साप म्हणून ओळखला जात असून हा साप सहसा रात्रीच्या वेळी आढळून येतो, या सापाचे दात लहान असल्याने साप चावलेले देखील समजून येत नाही.

बिनविषारी सापांची नावे
धामण, तस्कर, गवत्या, कवड्या, मांढुळ, डुरक्या घोणस, दिवड, चित्रांग नायकूळ, कुकरी, वाळा, नानेटी, धूळ नागीण, अजगर हे सर्व साप बिनविषारी वर्गातील आहेत. तर हरणटोळ व मांजऱ्या हे निमविषारी जातीचे साप आहे.

सर्पदंश वरील प्रथमोपचार व कार्यवाही…
सर्पदंश झाल्यास सर्पदंशाची जागा स्वच्छ धुवावी, सदर दंशच्या काही अंतरावर रुमाल अथवा कापडाने आवळपट्टी बांधावी. मात्र अशा प्रकारची पट्टी फक्त नाग व मण्यार असल्यास बांधावी. तसेच सर्पदंश झालेल्या व्यक्तीला झोपू ण देता तातडीने जवळील सरकारी रुग्णालयात घेऊन जावे. जिल्ह्यातील प्रत्येक सरकारी रुग्णालयांमध्ये सर्पदंश वरील लस उपलब्ध असतात. लस साठी इतरत्र फिरत बसू नये.

सर्पमित्र ॲप मोबाईलमध्ये प्रभावशाली…
देशभरातील सर्व भागातील सर्पमित्रांची माहिती व सापांबाबत माहिती नागरिकांना उपलब्ध होण्यासाठी बारामती येथील अमोल जाधव या सर्पमित्राने सर्पमित्र ॲप तयार केले असून त्यामुळे नागरिकांना देशभरातील सर्व सापांची माहिती तसेच आपल्या भागातील सर्पमित्रांची माहिती व मोबाईल नंबर उपलब्ध होत आहेत त्यामुळे सर्पमित्र ॲप मोबाईलमध्ये प्रभावशाली असल्याचे दिसून येत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात महसूलचे अधिकारी कर्मचारी आरक्षण सोडतीत व्यस्त; अन मुरुम माफिया नैसर्गिक संपत्तीच्या लुटीत मस्त…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात आज (शुक्रवार) ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वार्डनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया…

16 तास ago

रांजणगाव MIDC मधील औषध कंपनीला २५ लाखांच्या खंडणीची मागणी; वकिलाविरोधात गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका नामांकित औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनी…

16 तास ago

कुर्ला विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस…

21 तास ago

राष्ट्रवादीतील संघर्षाचा फुगा आणि घराणेशाहीची वास्तवकथा

मुंबई: राजकारणात काही गोष्टी इतक्या उघडपणे घडतात की त्यावर भाष्य करण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते; फक्त…

21 तास ago

विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा! डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची ‘स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’ सुरू

मुंबई: राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी…

21 तास ago

पुणे विषारी दारू प्रकरणाच्या तपासाला वेग; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनांनुसार सीआयडीची व्यापक कारवाई

पुणे: पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाची शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती…

21 तास ago