नागपूर: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना मराठी भाषिक लोकांना आधार देण्यासाठी, मराठी भाषिकांना महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. सर्वजण तुमच्यासोबत उभे आहोत असे चित्र निर्माण करण्यासाठी दोन्ही सभागृहात ठराव एकमताने मंजूर करायला तयार आहोत त्यामुळे तो ठराव घ्या, अशी विनंती करण्यात आली होती. परंतु आज आठवडा संपतोय तरीही त्यांनी तो ठराव घेतला नाही मात्र सोमवारी तो ठराव कोणत्याही परिस्थितीत घेण्यास भाग पाडू अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला ठणकावून सांगितले.
भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना महाविकास आघाडीचे आमदार श्रद्धांजली वाहत आहे आणि दुसरीकडे शिंदेसरकार कामकाज करत आहेत. मुळात सरकारने विधानसभा सदस्य म्हणून आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहून कामकाज थांबवायला हवे होते, असे मत व्यक्त करत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान विधानभवनाच्या पायर्यांवर प्रती सभागृह भरवून महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेना नेते आमदार भास्करराव जाधव, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपले विचार मांडले व महापुरुषांचा अपमान करणार्या सरकारचा निषेध केला.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…