क्राईम

विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; १४ वर्षांच्या मुलीसह चौघांचा मृत्यू

सोलापूर: मंगळवेढ्याजवळ पंढरपूर–सोलापूर महामार्गावर सोमवारी (२६ जानेवारी २०२६) सायंकाळी भीषण अपघात झाला. देवदर्शनासाठी पंढरपूरला गेलेल्या मुंबईच्या भाविकांच्या क्रुझर गाडीला एका मालवाहतूक कंटेनर ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात तीन महिला आणि १४ वर्षांच्या मुलासह चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास शरद नगर, मल्लेवाडी (ता. मंगळवेढा) येथे घडला. मुंबईहून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची क्रुझर गाडी मंगळवेढा मार्गे जात असताना, ढेकळेवाडी गावाजवळ समोरून येणाऱ्या कंटेनर ट्रकने भरधाव वेगात आणि चुकीच्या दिशेने येत क्रुझरला धडक दिली. धडकेनंतर क्रुझर गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली.

या भीषण अपघातात योगिनी केकाणे, सोनम अहिरे, आदित्य गुप्ता (वय १४) आणि सविता गुप्ता यांचा जागीच मृत्यू झाला. तर अंजली यादव, सोहम घुगे यांच्यासह अन्य सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने मंगळवेढा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य तातडीने सुरू केले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली.

अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कंटेनर ट्रकचा क्रमांक HH 46 BU-6651 असून, चालक युवराज यशवंत गळवे याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

3 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

3 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

3 तास ago

7 तारखेपर्यंत पगार अनिवार्य; नोकरी सोडल्यानंतर 2 दिवसांत Full & Final, नवीन कामगार नियमांची माहिती

मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…

3 तास ago

प्रदीप कबरे यांच्या ‘खिडकी’ अभिवाचनाचा विशेष प्रयोग ३० जुलैला दादरच्या शिवाजी मंदिरात

मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…

3 तास ago

अपघातग्रस्त तरुणीला सुनेत्रा पवार यांची तात्काळ मदत; रुग्णालयात दाखल करून उपचाराची केली व्यवस्था

बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…

3 तास ago