शिरुर (अरुणकुमार मोटे): न्हावरे -उरळगाव रोडवर अशोक विनायक साञस याला निमोने (ता. शिरूर) येथील मुलीबरोबर तुझे प्रेमकरण आहे मग तु खोटे का बोलला? असे म्हणत आरोपी समिर शेलार रा. निमोने वत्याचा साथीदार नाव व पत्ता माहीत नाही. यांनी अशोक सात्रस याला लाकडी दांडक्याने, दगडाने मारहाण करत शिविगाळ केली आहे.
याबाबत सविस्तर हकिकत अशी की, (दि. २१) फेब्रुवारी रोजी दुपारी ३: ३५ वा अशोक सात्रस व त्याचा मित्र स्वप्नील दत्तात्रय बिडगर असे दोघे एका मोटारसायकलवरुन न्हावरे येथून घरी उरळगावला चालले होते. न्हावरे गावातील स्मशान भुमीचा कॉर्नर पास करुन थोडे पुढे गेल्यावर आरोपी नामे समिर शेलार रा. निमोने व त्याचा साथीदार नाव व पत्ता माहीत नाही यापैकि समिर शेलार याने अशोक सात्रस यांची मोटार सायकल थांबवण्याचा इशारा केला. तेंव्हा त्याने मोटारसायकल थांबविली.
त्यावेळी समीर शेलार यांनी त्याला निमोने येथील मुलीबरोबर प्रेम प्रकरण चालू आहे, तू मला खोटे का बोलला? या कारणावरून शिवीगाळ करून हातातील लाकडी दांडक्याने दोन्ही हाताच्या दंडावर, पाठीवर मारहाण करून जखमी केले आहे. त्यानंतर पुढे जात असताना पुन्हा त्या दोघांनी न्हावरे गावापर्यंत अशोक सात्रसचा पाठलाग केला.
गावात पकडून आरोपी समीर शेलार यांनी पुन्हा लाकडी दांडक्याने मारहाण केली. व त्याच्या साथीदाराने दगडाने डाव्या हाताच्या मनगटा जवळ मारून जखमी केले आहे. या प्रकरणी दोघांवर शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार गोपीनाथ चव्हाण हे करत आहे.
ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…