शिरूर तालुका

शिरूर शहरातून डिझायर कारची चोरी …

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील वाहन चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून रेव्हेन्यू कॉलनी येथून मारुती कंपनीची डिझायर कार सोमवारी (दि. २०) रात्री चोरीला गेली आहे.

पुण्यातील कात्रज येथील मनिषा धनंजय पवार या नोकरी निमित्त शिरूर मधील रेव्हेन्यू कॉलनी येथे राहत असून सोमवारी रात्री 9 वाजता त्यांची गाडी रोडच्या कडेला लावली होती. त्यांनी मंगळवारी सकाळी 9 वाजता येऊन पाहिले असता रात्री गाडी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

अंदाजे 6 लाख रुपये किंमत असलेली मारुती कंपनीची पांढरी रंगाची डिझायर कार नं. MH12 PZ 0423 इंजिन क्रमांक 2126249 MA3 CZF 635HM 242379 हा आहे. मनिषा पवार यांनी याबाबत रोडच्या कडेला लावलेली गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. तसेच गाडीचे मुळ कागदपत्रे कारमध्ये होते. अशी तक्रार शिरूर पोलिसांत दाखल केली असून पोलीस नाईक मोरे पुढील तपास करत आहेत.

काही दिवसांपासून शिरूर शहरामध्ये कारसह दुचाकी, सोनसाखळी चोरांनी हौदोस घातला असून त्यांना जेरबंद करण्याचे आव्हाण शिरूर पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

8 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago