क्राईम

राज्यात खळबळ! रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटक

पुणे: पुण्यामधील खराडी येथे अलिशान फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये रोहिणी खडसे यांच्या नवऱ्याला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती समोर आली आहे. हाऊस पार्टीच्या नावाखाली पुण्यातील खराडी येथे रेव्ह पार्टी सुरू होती. पोलिसांनी रेव्ह पार्टीवर धाड टाकत सात जणांना ताब्यात घेतले. फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये अंमली पदार्थ, दारू, हुक्का होता, अशी माहिती समोर आली आहे.

पुणे शहरातील उच्चभ्रू खराडी परिसरातील फ्लॅटमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर गुन्हे शाखेने मध्यरात्री छापा टाकला. पोलिसांनी कारवाईत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, मद्य व हुक्के जप्त केले असून, पार्टीमध्ये नशेचे सेवन सुरू होते. पार्टीत सहभागी असलेल्या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचा समावेश आहे.

खराडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत अमली पदार्थ, दारू आणि हुक्क्याचं सेवन होत असल्याचं उघड झालं. या पार्टीत तीन महिला आणि ४ पुरुष सहभागी होते. २६ जुलै २०२५ रोजी रात्री उशिरा पुणे पोलिसांनी छापा टाकून अमली पदार्थ, दारू आणि हुक्का जप्त केला. विशेष बाब म्हणजे, या रेव्ह पार्टीत एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचा समावेश होता. पोलिसांनी प्रांजल खेवलकर आणि आणखी एका व्यक्तीला अटक केली असून, त्यांना ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आलं आहे. तपास सुरू आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

2 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

11 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

11 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

11 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

11 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

12 तास ago