महाराष्ट्र

ए ही बोलायची पद्धत नाही; अजित पवार

बारामती: उपमुख्यंत्री अजित पवार हे नेहमीच धडाडीचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कामाचा वेग आणि थेट बोलण्याची पद्धत यामुळे ते सगळीकडे ओळखले जातात. कामात कुचराई केल्यामुळे ते अनेकदा शासकीय अधिकाऱ्यांवर संतापल्याचेही दिसले आहे.

सध्या मात्र अजितदादा पत्रकार परिषद चालू असताना एका व्यक्तीने नोकरी द्या अशी मागणी करताच चांगलेच संतापले आहेत. त्यांनी समोरच्या व्यक्तीला बोलण्याची ही पद्धत नाही, असे म्हणत चांगलेच सुनावले असून नियमात बसत असेल तर शंभर टक्के लाभ मिळेल असे आश्वासनही दिले आहे.

राज्याच्या क्रीडामंत्र्यांना भेटा; अजित पवार

अजित पवार यांनिा माध्यम प्रतिनिधींनी त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची थेट उत्तरेही त्यांनी दिली. दरम्यान, पत्रकारांशी बोलत असतानाच एक व्यक्ती त्यांच्याकडे आली. दादा मला गव्हर्नेमेंट जॉब द्या, अशी मागणी करू लागली. त्यानंतर अजितदादांनी हे प्रकरण क्रीडा क्षेत्राशी संबंधित असल्याने त्यांनी तिथेच आमचे क्रीडामंत्री दत्ता भरणे आहेत. त्यांना तुम्ही जाऊन भेटा, असा सल्ला त्या तरुणाला दिला.

तर शंभर टक्के तुझं काम होईल

त्यानंतर समोरच्या व्यक्तीने आपले चालूच ठेवल्याने अजित पवार संतापले. तुला हीच जागा आठवली का? असा सवाल त्यांनी केला. त्यानंतरही समोरची व्यक्ती अजित पवार यांना बोलू लागली. यावर मात्र अजित पवार यांनी त्या व्यक्तीला मध्येच थांबवत ‘ए बोलायची ही पद्धत नाही. मी माहिती घेईल. मी कागद घेईन. तो व्यवस्थित पाहीन. तू बोलतोय त्यात तथ्य आहे का? हे बघेन. राज्य सरकारचं जे क्रीडाविषयक धोरण असेल त्यात तू बसत असशील तर शंभर टक्के तुझं काम होईल. तू सरकारच्या धोरणात बसत नसशील तर तुला तसं कळवण्यात येईल,’ असं थेट अजित पवार यांनी त्या व्यक्तीला समजावलं.

माणिकराव कोकाटे यांच्याविषयी काय निर्णय?

अजित पवार यांनी खडसावल्यानंतर मात्र समोरची व्यक्ती शांत झाली. त्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीन्याची चर्चा यावरही प्रतिक्रिया दिली. मी सोमवारी किंवा मंगळवारी माणिकराव कोकाटे यांचे म्हणणे ऐकून घेईल. त्यानंतर काय तो निर्णय होईल, असं अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात सामाईक विहिरीच्या पाण्यावरून वाद पेटला; दगड अन् कुऱ्हाडीने मारहाण…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात सामाईक विहिरीवरील पाण्याची मोटार बंद केल्याचा जाब विचारणे आणि…

32 मिनिटे ago

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र फोडून ५२० किलो तांब्याच्या तारांची चोरी…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यातील करडे येथे अज्ञात चोरट्यांनी विद्युत रोहित्र फोडुन त्यातील तब्बल…

37 मिनिटे ago

शिक्रापूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला दहा गुन्ह्यांचा आरोपी! पुण्यातून अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल ४ लाख २५…

20 तास ago

शिरूर पोलिसांची दिपावलीच्या पार्श्वभुमीवर सराफ कट्टा व मुख्य बाजारपेठेत पायी गस्त…

शिरूर (तेजस फडके) : आगामी दिपावळी सणाच्या पार्श्वभूमीवर शिरुर शहरातील नागरिक, व्यापारी आणि सराफ व्यावसायिकांच्या…

21 तास ago

खरगे यांच्या एका शब्दावरून भाजपाचे आकांडतांडव; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पलटवार

मोदी-शाह यांनी काँग्रेस नेत्यांबद्दल वापरलेल्या भाषेची आठवण करून देत सपकाळांचा भाजपावर निशाणा मुंबई: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना नडाल तर तुरुंगात पाठवू! सक्तीच्या कर्जवसुलीवर एकनाथ शिंदेंचा इशारा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार; हरसूलमध्ये १० हजार कुटुंबांना दिवाळी शिधावाटप नाशिक: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून सक्तीने…

2 दिवस ago